अहिल्यानगर तालुक्यात पशुधन सर्वेक्षणा ला वेग १४ गावांमध्ये माहिती संकलन सुरू
पशुधनाची संख्या प्रजाती आणि चारा उपलब्धतेची होणार नोंद पशुपालकांना सहकार्याचे आवाहन

अहिल्यानगर तालुक्यात पशुधन सर्वेक्षणा ला वेग १४ गावांमध्ये माहिती संकलन सुरू
पशुधनाची संख्या प्रजाती आणि चारा उपलब्धतेची होणार नोंद पशुपालकांना सहकार्याचे आवाहन
उक्कडगांव / प्रतिनिधी : बाबु तिपुळे
अहिल्यानगर तालुक्यातील नारायणडोह उक्कडगांव मांडवे दरेवाडी वाकोडी निबोंडी शिराढोण रुईछत्तीसी अंबिलवाडी मठपिंप्री हातवळण वाटेफळ दहिगाव साकत या गावांमध्ये पशुधन सर्वेक्षणाचे काम वेगाने सुरू आहे या सर्वेक्षणा अंतर्गत पशु वैद्यकिय कर्मचारी गावोगावी भेट देऊन पशुपालकांकडून पशुधनाची विविध माहिती संकलीत करत आहेत .
या सर्वेक्षणामध्ये प्रत्येक गावातील पशुधनाची संख्या जनावरांच्या विविध प्रजाती पशुपालनाची सध्यास्थिति चारा पिकांची उपलब्धता व लगवड तसेच पशुधनाशी संबंधीत अन्य माहिती नोंद करण्यात येत आहे .
या माहितीच्या आधारे संबंधीत गावामधील पशुधनाची अचुक अकडे वारी आणि सध्यास्थिती समोर येण्यास मदत होणार आहे .
पशुधन सर्वेक्षणामुळे पशुपालकांच्या गरजा ओळखणे चारा उपलब्धेचे नियोजन करणे आणि जनावरांसाठी आवश्यक पशुवैकिय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण माहिती मिळणार आहे .
तसेच भविष्यात लशीकरण पशुरोग प्रतिबंधक उपाययोजना चारा नियोजन आणि शासनाच्या पशुसंवर्धन विषयी विविध प्रकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी या सर्वेक्षणाचा उपयोग होणार आहे .
सर्वेक्षणाचे काम वेळेत आणि अचुक पद्धतीने पूर्ण करण्यासाठी पशुवैद्यकीय यंत्रणा प्रयत्न शिल आहे .
पशुधनाची योग्य माहिती उपलब्ध झाल्यास पशुसंवर्धन विभागाला भविष्यातील योजनेचे नियोजन अधिक प्रभाविपणे करता येणार आहे
सर्वेक्षणासाठी गावात येणार्या पशुवैद्यकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांना पशुपालकांनी आपल्या पशुधनाबाबत अचुक व आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन रुईछत्तीसी येथील पशुधन पर्यवेक्षक डॉ. संतोष साळुंके निलेश गोरे नवनाथ खराडे डॉ. वैष्णव साबळे यांनी केली आहे .


