न्यू आर्ट्सच्या बीबीए आणि बीबीए (आय.बी) या विभागाचा तीन दिवसीय “दीक्षारंभ २०२५” विद्यार्थ्यांना दिशा देणारा…….. प्रा.डॉ.मंगेश वाघमारे
न्यू आर्ट्सच्या बीबीए आणि बीबीए (आय.बी) या विभागाचा तीन दिवसीय “दीक्षारंभ २०२५” विद्यार्थ्यांना दिशा देणारा…….. प्रा.डॉ.मंगेश वाघमारे
प्रतिनिधी : संवेद वायकर
अहिल्यानगर : न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स महाविद्यालयात एआयसीटीई अंतर्गत बीबीए आणि बीबीए (आय.बी) विभागात नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी ‘दीक्षारंभ’ हा कार्यक्रम आयोजित केला जातो. यावर्षी दीक्षारंभ २०२५ मध्ये विभागातर्फे नामांकित महाविद्यालयातून व नामांकित विद्यापीठातून व्याख्यात्यांना आमंत्रित करण्यात आले होते. बी.बी.ए. व बी.बी.ए. (आय. बी.) विभागाचे विभाग प्रमुख मा.प्रा. डॉ. मंगेश वाघमारे यांच्या हस्ते “दीक्षारंभ २०२५” चे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. मंगेश वाघमारे यांनी भारतरत्न विश्वेश्वरय्या यांचे विचार सांगितले. कुठलीही सेवा देत असताना त्या सेवेमध्ये अशा काही गोष्टींचा सामावेश करावा लागतो ज्या पैशाने विकत घेता येत नाहीत. पुस्तकी ज्ञानाबरोबर आयुष्यात येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी स्वतः मध्ये बदल करावा. सध्याच्या जेन – झी च्या जमान्यात विद्यार्थी खूप टेक्नोसॅव्ही झालेले आहेत. जेन-झी चा स्वभाव, भावना, अपेक्षा लक्षात घेऊन शिक्षकांनी त्यांचा ताण तणाव याचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे असे त्यांनी नमूद केले. चालू शैक्षणिक वर्षात बीबीए व बीबीए (आय.बी) या वर्गाची संपूर्ण प्रवेश पहिल्याच फेरीत पूर्ण झालेले आहेत. यामागे विद्यार्थी व पालक यांनी देखील दाखवलेला विश्वास त्यामुळे विभाग एका विशिष्ट उंचीवर गेलेला आहे. विशेषता: बीबीए व बीबीए (आय.बी)चे विद्यार्थी सर्व क्षेत्रात प्रगती करत आहेत या यशामागे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेचे पाठबळ तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांचे मार्गदर्शन व विभागातील सर्व प्राध्यापकांचे सहकार्य असल्याचे त्यांनी सांगितले.
दीक्षारंभ २०२५ या तीन दिवसीय समारंभात पहिल्या दिवशी प्रा. तृप्ती खाबिया यांनी व्यक्तिमत्व विकास या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले प्रा. गिरीश कुकरेजा यांनी ताण तणावाचे व्यवस्थापन या विषयावर आपल्या खास शैलीत संवाद साधला. दुसऱ्या दिवशी फ्लेम युनिव्हर्सिटी, पुणे येथील ट्रेनर मयुरी गायकवाड हिने संभाषण कौशल्य या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रा.डॉ. तुशीता अय्यर यांनी टाईम मॅनेजमेंट या विषयावर संवाद साधला व वेळेचे व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचे ते त्यांनी सांगितले.तिसऱ्या दिवशी महाविद्यालयातील प्रा.पुर्वा खिस्ती यांनी विद्यार्थ्यांना स्वाभाविक बुद्धिमत्ता आणि भावनात्मक बुद्धिमत्ता याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्यानंतरआय.सी.एफ.एआय.(आय.बी.एस.) बिझनेस स्कूल, पुणे येथील प्रा. रुक्षिण वाजिफदार यांनी विद्यार्थ्यांना मायक्रो प्रेझेंटेशन, गट चर्चा आणि मॉक इंटरव्यूव्ह यासंदर्भात विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.बी.बी.ए. (आय.बी.) विभागातील प्रा.नम्रता ठाकर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच बी.बी.ए. व बी.बी.ए.(आय.बी.) या वर्गासाठी तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांची ओळख करून दिली व श्रेयांक आराखडा सादर केला.
दीक्षारंभ समारंभात विविध मान्यवरांनी वेगवेगळ्या विषयास अनुसरून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व करिअर संदर्भात केलेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला. सर्व विद्यार्थ्यांनी सदर कार्यक्रमास सकारात्मक प्रतिसाद दिला.
“दीक्षारंभ २०२५”कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. दीक्षारंभ कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा.डॉ.राहुल थोरात यांनी प्रभावी व्यवस्थापन केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता विभागातील प्रा. डॉ. सतीश जगताप, प्रा.अभिजीत सातभाई, प्रा. अनिता पेटकर, प्रा. शामल जाधव, प्रा. नम्रता ठाकर आणि डॉ.रूपाली मिस्कीन यांनी परिश्रम घेतले.
फोटो कॅप्शन : न्यू आर्ट्स महाविद्यालयातील बीबीए व बीबीए (आय.बी) विभाग आयोजित ‘दीक्षारंभ २०२५’ या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना विभागप्रमुख प्रा. डॉ.मंगेश वाघमारे समवेत प्रा. डॉ. सतीश जगताप, प्रा.डॉ. राहूल थोरात,प्रा.अभिजीत सातभाई, प्रा. अनिता पेटकर,प्रा.शामल जाधव, प्रा. नम्रता ठाकर डॉ. रूपाली मिस्कीन व प्रा. तृप्ती खाबिया



