Breaking
ब्रेकिंग

स्नेहबंध फौंडेशनतर्फे” जिल्हास्तरीय किल्ले बनवण्याची स्पर्धा २०२६

0 8 9 6 6 2

“स्नेहबंध फौंडेशनतर्फे” जिल्हास्तरीय किल्ले बनवण्याची स्पर्धा २०२६

अहिल्यानगर – दिवाळीत किल्ले बनवण्याची परंपरा जपण्याच्या उद्देशाने स्नेहबंध सोशल फौंडेशनच्या वतीने जिल्हास्तरीय किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी दिली.
दिवाळीत लहान मुले एकत्र येऊन विविध किल्ले साकारतात. लहान मुलांच्या कल्पकतेला वाव देणाऱ्या आणि आपल्या इतिहासाबद्दल जागरुकता निर्माण करणाऱ्या या उपक्रमाला चालना देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यांना या स्पर्धेत सहभाग घ्यावयाचा आहे, त्यांनी आपले पूर्ण नाव, पत्ता व मोबाईल नंबरसह ११ नोव्हेंबर पर्यंत ८७९३ १९१९१९ या क्रमांकावर मोबाईलवर काढलेला अर्ध्या मिनिटाचा व्हीडिओ व ३ ते ४ फोटो पाठवावे.(जुना व्हिडिओ व फोटो चालणार नाही.) किल्ला दगडमातीचा असावा, पण सजावटीकरता अन्य वस्तू व रंग वापरता येतील. इकोफ्रेंडली किल्ला असल्यास त्यालाही विशेष गुण दिले जाणार आहेत. स्नेहबंधचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली समिती परीक्षण करून पहिल्या तीन स्पर्धकांना मान्यवरांचा उपस्थितीत दिवाळी झाल्यानंतर गौरवण्यात येणार आहे. मागील विजेत्या स्पर्धकांना प्रवेश मिळणार नाही. स्पर्धेत प्रवेश मोफत आहे. स्पर्धेचे प्रायोजक अवनीश क्रिएशन चे संचालक (शिल्पकार) श्री. बालाजी वल्लाल हे आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 6 6 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे