Breaking
ब्रेकिंग

बाजार समिती करमाळा येथे दर रविवारी सेंद्रिय भाजीपाला आठवडी बाजार सुरु

0 8 6 5 3 1

बाजार समिती करमाळा येथे दर रविवारी सेंद्रिय भाजीपाला आठवडी बाजार सुरु

नागरिकांमधे आनंदाचे वातावरण

करमाळा / विशेष प्रतिनिधी :  सचिन जव्हेरी

दि 5/10/2025 रोजी सकाळी 9.30 वा करमाळा शहरात एक आगळा वेगळा नावीन्यपूर्ण उपक्रम कृषी उत्पन्न बाजार समितिने हाती घेतला असून. रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यांचा विचार करून पूर्ण पणे सेंद्रिय खतांचा वापर करून पिकवलेला भाजी पाला *पाणी* *फाऊंडेशन करमाळा* यांच्या च्या *संकल्पनेतून* व महाराष्ट्र राज्य कृ उ बा समितीचे संचालक तथा कृ उ बा समिती करमाळा चे चेअरमन *मा आ* *जयवंतराव जगताप यांच्या विशेष सहकार्यातून* सेंद्रिय भाजीपाला आठवडी बाजार सुरु करण्यात येणार आहे.

आपल्या धकाधकीच्या जीवनात आरोग्यदायी भाजीपाला आपल्या सेवेसाठी उद्यापासून मिळण्यास सुरु होत आहे. तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा्. अशी विनंती कृ उ बा समिती यांचे कडून करण्यात येतं आहे.

या *भव्य उदघाट्न* समारंभसाठी प्रमुख पाहुणे म्हणून *सत्यवान देशमुख -राज्य समन्वयक* *पाणी फाऊंडेशन* हे उपस्थित राहणार असून *प्रमुख* *उपस्थिती* खरेदी विक्री संघाचे चेअरमन, कृ उ बा समितीचे विद्यमान संचालक युवा नेते शंभूराजे (दादा) जयवंतराव जगताप हे उपस्थित राहणार आहेत.

तरी शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी उपस्थित राहावे . आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी या संधीचा लाभ घ्यावा अशी ही विनंती कृ उ बा समितीच्या वतीने सर्वांना करण्यात आली.

दर रविवारी सकाळी 8 वा कृ उ* *बा समिती करमाळा* *या* *ठिकाणी सेंद्रिय भाजीपाला आठवडी* *बाजार सुरु राहणार आहे* .

1/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 3 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे