Breaking
ब्रेकिंग

स्वातंत्र्यलढा स्मरण पदयात्रा अमळनेर ते डांगरी

0 3 9 0 2 1

स्वातंत्र्यलढा स्मरण पदयात्रा अमळनेर ते डांगरी

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर :- दि. २६ एप्रिल २०२५ रोजी अमळनेर शहरातील  तमाम नागरिकांना गौरवाने सांगावेसे वाटते की, स्वातंत्र्याने प्रत्येक भारतीयाला मोकळे आकाश दिले. शोषण, गुलामगिरी, दारिद्र्य व निरक्षरतेपासून मुक्ती दिली, समतेचा अधिकार दिला ते स्वातंत्र्य अमूल्य आहे. आपण देशभक्त, राष्ट्रनिष्ठ नागरिक स्वातंत्र लढ्यातील क्रांतिकारकांना आठवणीत ठेवतो. त्यांचे कार्य म्हणजे भारत देश गुलामीतून मुक्त करणे, तसेच देश जडणघडणीतील योगदान. याची जाणीव पुन्हा एकदा अधोरेखित करण्यासाठी पदयात्रेच्या माध्यमातून सर्वांना इतिहासासोबतच वर्तमानाचेही समाजभान आदान प्रदानासाठी संकल्प करीत आहोत.सौ. गीतांजली संदीप घोरपडे, डॉ. व्ही. डी. पाटील व श्री. बी. के. सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली अमळनेर ते डांगरी पर्यंत पदयात्रा आयोजित करीत आहोत. डांगरी येथील अनेकांनी स्वातंत्र्यासाठी लाठ्या-काठ्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगला त्यातून आपल्याला स्वातंत्र मिळाले म्हणून त्यांच्या गावी जाऊन, त्या गावाची माती कपाळाला लावून आम्ही तरुणाईला संदेश देऊ इच्छितो.पदयात्रींसाठी सूचना -१. स्वच्छ सैल पांढरे कपडे परिधान करावे.२. आवश्यक वस्तूंसाठी पिशवी व पाण्याची बाटली असावी.४. दिनांक २३ एप्रिल पर्यत नोंदणी आवश्यक.आपणांस पदयात्रेत सामील व्हायचे असल्यास नियोजन सहज सुलभ व्हावे याकरिता संपर्क करा.
सौ. गीतांजली संदीप घोरपडे राज्य कार्यकारणी सदस्य
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस  9422279710
डॉ. व्ही. डी. पाटील तालुकाध्यक्ष धरणगांव अ.भा. राष्ट्रीय काँग्रेस 9923223275
श्री. बी. के. सूर्यवंशी तालुकाध्यक्ष अमळनेर  अ.भा. राष्ट्रीय काँग्रेस 9422279741
पदयात्रा प्रारंभ :
सकाळी ५.१५ वा. लिलाताई स्मारक ढेकू रोड, अमळनेर
पहिला थांबा :- सकाळी ६.३० वा. धार भवानी माता मंदीर परिसर
दुसरा थांबा :- सकाळी ८..०० वा. मारवड बस स्टैंड परिसर
समारोप : सकाळी १०.०० वा. डांगरी गाव प्रदक्षिणा व समारोप राम मंदीर
सहयोग : देशभक्त नागरिक, धार-मालपुर ग्रामस्थ, मारवड ग्रामस्थ, डांगरी ग्रामस्थ.
जय जगत, जय संविधान.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे