मिस & मिसेस वर्ल्ड 2026 ब्युटी पेझेंट चे ऑडिशन पुणे येथे 01 ऑगस्ट 2026 रोजी आयोजन
*मिस & मिसेस वर्ल्ड 2026 ब्युटी पेझेंट चे ऑडिशन पुणे येथे 01 ऑगस्ट 2026 रोजी आयोजन*
राहुरी तालुका जावेद शेख
द रॉयल ग्रुप प्रेझेंट विश्वसुंदरी 2026 मिस & मिसेस & किड्स वर्ल्ड 2026 मॉडेलिंग चे ऑडिशन पुणे येथे दिनांक 01 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित करण्यात आले आहे. पंडित जवाहरलाल नेहरू ऑडिटोरियम शिवाजीनगर पुणे येथे सकाळी 10 te 02 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी या ऑडिशन चा लाभ घ्यावा अशी विनंती रॉयल ग्रुप चे सर्वेसर्वा नितीन झगरे यांनी केली आहे. पुणे येथे प्रथमच मिस & मिसेस वर्ल्ड च्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या ऑडिशन साठी विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहे. यावेळी रॉयल ग्रुप च्या हेड धनश्री गरुड, ब्रँड अॅम्बेसिडर पूजा तापडिया, मॉडेल दिशा बागूल, तन्वी जाधव , ऋतुजा टेहरे, राजलक्ष्मी कोकणे, प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आदित्य ढमढेरे, वर्षा ढमढेरे, सीईओ सुमिता शिंदे , डॉ. सीमा इंग्रोळे , नमिता पाटील, नांदेड मॉडेल माधवी शिंदे, समृद्धी टिकोणे, काजल भोईटे, असो.डायरेक्टर ममता भोई दौंडे, गायत्री कवठेकर, आकाश रणदिवे, ऋषी पाटील, सिने अभिनेत्री सारिका साळुंके, बिग बॉस फेम तृप्तीताई देसाई उपस्थित राहणार आहे. ज्या स्पर्धकांना शो मध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी 9766873917 & 9370931509 या नंबर वर संपर्क साधावा अशी विनंती रॉयल ग्रुप ने केली आहे.


