पर्युषण पर्वा निमित्त नासिक येथे सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक शिरिष बेगडे यांच्या वतीने भावनायोग शिबिर संपन्न

पर्युषण पर्वा निमित्त नासिक येथे सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक शिरिष बेगडे यांच्या वतीने भावनायोग शिबिर संपन्न
एस डब्ल्यु न्यूज नेटवर्क
तथा गुणायतन प्रणेता *परमपूज्य मुनीश्री* *प्रमाणसागर* महाराज प्रणित भावनायोग प्रशिक्षक श्री शिरीष बेगडे जैन बांधवांच्या पर्युषण पर्वा निमित्त रविवार दि. २० नोव्हेंबर रोजी नासिक येथे सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक तथा गुणायतन प्रणेता *परमपूज्य मुनीश्री* *प्रमाणसागर* महाराज प्रणित भावनायोग प्रशिक्षक श्री शिरीष बेगडे यांनी, *आचार्य श्री स्वात्मनंदी महाराज चातुर्मास नासिक 2026 चिंतामणी प्राईड* या ठिकाणी दुपारी ४:०० वाजता
भावना योग काय आहे, त्याचा वैज्ञानिक दृष्टीकोण आणि तो कसा करावा याचे मार्गदर्शन केले.
व्यक्तिचे आत्मरुपांतरण घडविणारा भावना योग, आपल्या दैनंदिन जीवनाशी कसा निगडित आहे आणि तो दररोज केल्याने शरीर आणि मनाला कसे फायदे होतात त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
त्यांचे सोबत आलेले मेरी भावना मध्ये PHD केलेल्या डॉक्टर आरती गोरे नाशिक यांनीही महिलांना आणि छोट्या मुलांना भावनायोग केल्याने काय सकारात्मक परिवर्तन होऊ शकते याचे महत्व पटवून दिले. सदर कार्यक्रमास बहुसंख्य नाशिक जैन समाज बांधवांची उपस्थिती होती. चातुर्मास समिती नाशिकचे श्री. योगेश सिंगतकर, श्री. कल्पेश निलखे यांनी भावना योग प्रशिक्षकांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन सौ. सुहासताई निलखे यांनी केले.


