Breaking
ब्रेकिंग

जातप येथे शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त शालेय साहित्य वाटप

0 4 3 3 2 5

जातप येथे शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त शालेय साहित्य वाटप

राहुरी तालुका जावेद शेख

राहुरी तालुक्यातील जातप येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना आज गुरुवारी शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त शालेय साहित्य व फळ वाटप करण्यात आले.
शिवसेना शिंदे गट अध्यात्मिक आघाडीच्यावतीने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चैतन्य उद्योग समुहाचे अध्यक्ष गणेश भांड होते.

यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या अध्यात्मिक आघाडीचे जिल्हाप्रमुख संपत काका जाधव, शिवसेना शेतकरी आघाडीचे तालुकाप्रमुख किशोर मोरे, ह.भ.प नामदेव महाराज जाधव शास्त्री, तंटामुक्तीचे अध्यक्ष रावसाहेब  शिंदे, दादासाहेब शिंदे, चंद्रभान वाघ, भास्कर बोंबले, अशोक बोंबले, सुधाकर कदम, प्रवीण जाधव, कृष्णा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी उद्योजक गणेश भांड, संपत जाधव, नामदेव महाराज शास्त्री यांनी मनोगत व्यक्त केले. शाळेच्यावतीने उद्योजक भांड यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक संदीप गायकवाड, नरोडे मॅडम, शिंदे मॅडम, काटे मॅडम सय्यद भाभी यांनी अथक परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 3 2 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे