Breaking
ब्रेकिंग

करमाळा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर:- करमाळा तालुका अध्यक्षपदी पुनश्च: दिनेश मडके

0 3 9 0 2 6

करमाळा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर:- करमाळा तालुका अध्यक्षपदी पुनश्च: दिनेश मडके

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. १/ करमाळा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे नूतन कार्यकारिणी दि. 1/3/2025 रोजी जाहीर करण्यात आली. साप्ताहिक पवनपुत्रचे संपादक दैनिक जनसत्यचे तालुका प्रतिनिधी दिनेश उद्धव मडके यांची करमाळा तालुका अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. दिनेश मडके यांनी आज पर्यंत संघटनेचे काम निस्वार्थपणे आणि पूर्ण जबाबदारीने पार पाडले आहे. गेल्या चार वर्षापासून करमाळा तालुक्यातील डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना त्यांनी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने साहेब यांच्या प्रयत्नातून भविष्यात डिजिटल मीडियाला मिळणारा लाभ सर्व पत्रकारांना मिळावा यासाठी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या माध्यमातून दिनेश मडके यांनी सर्व पत्रकारांना नेहमीच एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. व त्यांच्या न्याय हक्कासाठी सदैव कार्य तत्पर राहून काम केल्यामुळे त्यांची पुन्हा एकदा तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

दिनेश मडके हे गेल्या 18 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून कुणबी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष, जगद्गुरु नरेंद्राचार्य भक्त सेवा मंडळाचे तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले असून सोलापूर जिल्हा मानवाधिकार समितीचे जिल्हाध्यक्ष म्हणून ते काम करत आहेत. नुकतीच त्यांची सोलापूर समरसता साहित्य परिषदेच्या सहकार्यवाहपदी निवड झाली आहे. करमाळा तालुक्यातील डिजिटल मीडिया क्षेत्रातील पत्रकारांना शासन मान्यता मिळवुन त्यांच्या कुटुंबाचे कल्याण झाले पाहिजे याकरिता ते काम करीत आहेत.

डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने साहेब, प्रदेश उपाध्यक्ष सतीश (भाऊ) सावंत, सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रवीण नागणे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा डिजीटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेची करमाळा तालुका नुतन कार्यकारिणी निवड जाहीर करण्यात आली.

करमाळा तालुका उपाध्यक्षपदी टी. व्ही. 9 मराठीचे शितलकुमार मोटे, कमलाईनगरीचे संपादक जयंत दळवी, करमाळा लाईव्हचे संपादक गौरव मोरे यांची निवड करण्यात आली आहे, तर सचिवपदी नरेंद्रसिंह ठाकुर यांची पुनश्च फेरनिवड करण्यात आली आहे. सहसचिवपदी सुर्यकांत होनप, खजिनदारपदी ॲड. सचिन हिरडे, किशोरकुमार शिंदे, तालुका संघटक राजू सय्यद, सहसंघटक तुषार जाधव, तालुका संपर्कप्रमुख अंगद भांडवलकर, सहसंपर्कप्रमुखपदी सागर गायकवाड, तालुका व्यवस्थापक संजय साखरे, तालुका प्रसिद्धीप्रमुख प्रफुल्ल दामोदरे, तालुका प्रवक्तेपदी प्रा. नंदकिशोर वलटे, कार्यवाह नितीन झिंजाडे, सहकार्यवाह राजाराम माने यांची निवड करण्यात आली आहे. बैठकीला उपस्थित असणाऱ्या नवनियुक्त सर्व पत्रकार बांधवांना निवड पत्र देऊन सन्मान करण्यात आला. करमाळा डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे नवनियुक्त प्रवक्ते प्रा. नंदकिशोर वलटे यांना शहीद मेजर अमोल निलंगे समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यकारणी सदस्य हर्षवर्धन गाडे, राहुल रामदासी शेखर स्वामी, संजय मस्कर, सचिन चव्हाण, प्रवीण अवचर, अविनाश जोशी, संजय कुलकर्णी, नागेश चेंडगे, सचिन जव्हेरी, संजय तेली यांची निवड करण्यात आली.

ज्येष्ठ सल्लागार सदस्यपदी महेश चिवटे, ॲड. बाबूराव हिरडे, नासिर कबीर, अलीम शेख, प्राध्यापक राजेश गायकवाड आशपाक सय्यद, अशोक नरसाळे, सुहास घोलप, डी. जी. पाखरे, आण्णा काळे यांची निवड करण्यात आली आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे