भरदिवसा चालकांचा गळा कापला …भरदिवसा चालकांचा खुन
हरभराने भरलेला ट्रक लुटण्याचा प्रयत्न…
विशेष प्रतिनिधी : शिवहरी म्हस्के
नगर प्रतिनिधी:- नगर तालुक्यातील नारायणडोह परिसरात आज सकाळच्या दरम्यान मालवाहतूक ट्रक आर जे,०७ जी.डी .७७९१ हि राजस्थान राज्यातील पासिंग मालवाहतूक ट्रक हा हरभरा घेऊन विक्री साठी आपल्या ईच्छित स्थळी जात असताना वाळुंज बायपास रस्ता वर मालवाहतूक गाडी रस्ता चुकल्याने नारायणडोह परिसरात बाय पास रस्तावर रस्ता विचारण्यासाठी नारायणडोह परिसरातील गाडी थांबवली असतात सदर गाडी चालकाला चाकुचा धाक दाखवून लुटण्यासाठी प्रयत्न केला. परंतु चालकाने प्रतिकार केल्याने लूटमारू आक्रमण झाल्याने लुटारूनी चालकाच्या चाकुने गळा कापल्याने चालक जागेवरच मृत्यू मुखी पडला सदर चालकाला रस्ता कडेला गाडीतून खाली फेकून दिले हा चालक मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. रस्ताने जाणाऱ्या प्रवाशी शी हि बाब तात्काळ पोलीस नियत्रंण कक्षाला दिली मुळे घटना स्थळी पोलीस दाखल झाले.
त्या वेळी हरभराने भरलेला ट्रक लुटीच्या उदेशाने आपल्या राहत असलेल्या ठिकाणी घेऊन जात असताना मालवाहतूक बेधडकपणे चालवल्याने नारायणडोह परिसरातील ७-८ विद्युत पोल खाली कोसळले,विद्युत ट्रान्सफॉर्मर जळाले, तारा तुटलेल्याने मोठा आवाज झाल्याने मोठी मालवाहतूक गाडी शेतात कशी घुसली आहे.हा सगळा काय आहे हे पाहत होते आणि सदर गाडी अडवण्यासाठी शेतकरी नारायणडोह ग्रामस्थ धावले असतात मद्यधुंद आरोपीनी शेतकरी अंगावर मालवाहतूक ट्रक घालण्याचा प्रयत्न केला. ट्रक अडवण्यासाठी प्रयत्न चालू केले पण मद्यधुंद तरुण ट्रक थांबा नाव घेत नाही हे लक्षात आल्यावर सदर खबर पोलीस देण्यात आली.सदर चालक खुन बातमी पोलीस घटना कळवली असता घटना स्थळी मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी जमली होती. ईकडे या हि हरभरा ने भरले मालवाहतूक ट्रक शेतकरी पाठलाग करत होते. हि घटना पोलीस समजल्या नंतर एक पथक सदर ट्रकचा पाठलाग साठी घटना स्थळी दाखल झाले. पोलीस आले हे पाहताच नारायणडोह रेल्वे स्थानक जवळ गाडी थांबवून यातील खुनातील आरोपी ट्रक मधुन उडी टाकून पळ काढला पंरतु आधी शेतकरी या ट्रक पाठलाग करत होते.पोलीस व स्थानिकांनी आरोपी मागे जात पुढे दाट गावात मध्ये आरोपी लपवून बसले होते.परंतु स्थानिक शेतकरी सदर परिसराची माहिती असल्याने पोलीस व ग्रामस्थांनी लपलेले आरोपी घटनास्थळी चाकु, मिरच पावडर, कट्टर, सहताब्यात घेतले हा एक फिल्मी दृश्य प्रमाणे नारायणडोह परिसरात हा घटना क्रम एक तास भर चालु होता. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील कारवाई साठी रवाना केले. सदर मालवाहतूक गाडीतील फिंगरप्रिंट पुरावे तज्ञ आधारे संकलित करण्याचे काम करण्यात आले घटना स्थळी वरीष्ठ पोलीस अधिकारी देखील उपस्थित झाले होते.
वाळुंज बायपास मालवाहतूक गाडी, प्रवासी फलक नसल्याने ते रस्ता नेहमी रस्ता चुकतात यात वेळ ईधन खर्च होते, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नाम फलक दिशादर्शक फलक लावणे आवश्यक आहे.
नगर तालुक्यातील बह्यवळण रस्तावर पोलीस प्रोटोलिंग होत नाही. त्यामुळे गुन्हेगारी वाढली आहे. तरी बाह्यवळण रस्ताने पोलीस पेट्रोलिंग करणे आवश्यक आहे.