Breaking
ब्रेकिंग

आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या च्या विशेष श्रमसंस्कार शिबिरास सुरूवात

0 3 9 0 7 2

आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या च्या विशेष श्रमसंस्कार शिबिरास सुरूवात

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. १९/ महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे आबासाहेब गरवारे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे दि. १५/१२/२०२४ ते २१/१२/२०२४ या दरम्यान श्रमसंस्कार हिवाळी शिबिराचे आयोजन दौंडकरवाडी येथे करण्यात आले आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या खेड तालुक्यातील दौंडकरवाडी येथे १५ डिसेंबर २०२४ रोजी शिबराचे उद्घाटन महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉ. विलास उगले यांच्या हस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी ‘राष्ट्र बांधणीसाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सेवा कार्य कसे करावे’ याबद्दलचे मार्गदर्शन त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

या प्रसंगी गरवारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या उप-प्राचार्या श्रीमती विनिता कापडे उपस्थित होत्या. दौंडकरवाडी गावचे माजी सरपंच श्री वामन लांडे (राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श सरपंच) यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या वेळी गावचे लोकनियुक्त सरपंच मा. श्री सिताराम गुजर, उपसरपंच श्री सागर दौंडकर व ग्रामस्थ मंडळी कार्यक्रमाला उपस्थित होते.

श्रमदान या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून दौंडकरवाडी येथे सर्व स्वयंसेवकांनी नाकेबंदी करण्यासाठी दोन बांध बांधण्याचे कार्य केले. या दोन्ही बांधांमुळे विहिरीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्याचे निदर्शनास आले. या श्रमसंस्कार शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध तज्ज्ञांना आमंत्रित केले होते. शिबिरातील व्याख्यानाचे पहिले पुष्प गुंफण्यासाठी आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील तत्त्वज्ञान विभागाचे डॉ. प्रदीपकुमार माने प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. ‘डिजिटल साक्षरता’ या विषयावर त्यानी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. तसेच दि. १७ डिसेंबर या दुसऱ्या दिवशी आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील डॉ. शोभा कारेकर यांनी विद्यार्थ्यांना ‘विकसनशील भारतात युवकांची प्रशासनातील भूमिका’ या विषयावर उद्बोधन केले. सहभागी स्वयंसेवकांनी दौंडकरवाडी येथील महारष्ट्र शासनाच्या वनविभागाशी संपर्क साधून वन क्षेत्रात तण काढणे, झाडांना आळे करणे व वनातील रस्त्यांची सफाई इ. कामे केली. याप्रसंगी श्री. अमोल सातपुते, भारतीय वन सेवा, उप वनसंरक्षक, जुन्नर वनविभाग तसेच श्री. संतोष कंक, वनपरिक्षेत्र अधिकारी, चाकण, जुन्नर वनविभाग आणि शैलाताई भोजणे वन रक्षक यांनी सहकार्य केले.

दि. १८ डिसेंबर रोजी आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील मा. प्राध्यापक श्री. सुधीरजी गाडे यांनी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर : मार्गदर्शक जीवन’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या व्याख्यानातून अहिल्यादेवी होळकर यांची राजकीय व्यवस्था आणि त्यांचे जीवन कार्य कसे होते हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. शिबिरामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते. विद्यार्थ्यांच्या विविध गटांनी वेगवेगळे कार्यक्रम सादर केले. देश आधुनिकतेकडे जात असताना सुद्धा अनेक गोष्टी बदलल्या नाहीत, त्यातलीच एक गोष्ट म्हणजे ‘बालविवाह व हुंडा पद्धती’ या विषयावर तसेच मोबाईलचे दुष्परिणाम, गडकिल्ल्यांचे संरक्षण, स्वच्छता, पाणी प्रश्न अशा विविध विषयांवर स्वयंसेवकांनी पथनाट्यंद्वारे ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली. या श्रमसंस्कार शिबिराचे कार्यक्रम अधिकारी प्रा. मधुकर वाळुंज, प्रा. किसन कुमरे, डॉ. शितल शेवते व श्री दिलीप सोनकांबळे सर आणि इतर सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे