तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत अंश दुर्गेश राठोड प्रथम

तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत अंश दुर्गेश राठोड प्रथम
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. १८/ क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापर यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा येथे आयोजित तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत श्री गिरधरदास देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यानी उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत अंश दुर्गेश राठोड याने प्रथम क्रमांक पटकावत यश संपादन केले.
या यशामुळे अंश राठोड याची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यशस्वी खेळाडूंना श्री गिरधरदास देवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष कन्हैयालालजी देवी, विश्वस्त सौ. सुनिता देवी, मुख्याध्यापिका अश्विनी देशमाने तसेच पृथ्वीराज देशमुख सर, तेजश्री देशमुख मॅडम आणि क्रीडाशिक्षक बोळगे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
अंश राठोड याने मिळवलेल्या याच्याबद्दल त्याचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक होत आहे व शुभेच्छांचा वर्ष होत आहे.



