राहुरीत बच्चुभाऊं कडू याच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरा सह विविध कार्यक्रमाचे आयोजन

राहुरीत बच्चुभाऊं कडू याच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरा सह विविध कार्यक्रमाचे आयोजन*
राहुरी तालुका जावेद शेख
राहुरीत प्रहार दिव्यांग संघटना व दिव्यांग शक्ती सेवा संस्थेच्या वतीने दिव्यांग स्वाभिमान दिन, व दिव्यांग हृदयसम्राट माजी राज्यमंत्री मा.बच्चु कडु यांच्या वाढदिवसा निमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात शंभर दिव्यांग बांधवांनी सहभाग घेऊन 20 दिव्यांग बांधवांनी रोटरी ब्लड बँक राहुरी या ठिकाणी रक्तदान केले तसेच अहिल्याबाईभवन येथे शोभेचे झाडे लावून वृक्षारोपण तसेच बॅनरबाजी अवांतर खर्चाला फाटा देऊन राहुरी स्टेशन येथील कृपा वृध्दाश्रमास बाजरीची एक गोणी देण्यात आली. असे उपक्रम 2012 पासून दर वर्षी राहुरीत करण्यात येतो. मा. बच्चूभाऊ कडू यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!आपली लढाऊ वृत्ती, पारदर्शकता आणि हृदयसम्राट म्हणून ओळख निर्माण करणारा संघर्ष आजही लाखो शेतकरी, शेतमजूर व वृद्ध विधवा दिव्यांग बांधवांना ऊर्जा देतो आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच श्रींसाई च्या चरणी प्रार्थना.यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाअध्यक्ष मा.मधुकर घाडगे साहेब, जिल्हा सल्लागार सलीमभाई शेख राहुरी तालुका अध्यक्ष योगेश लबडे राहुरी मुकबधिर संघटनेचे अध्यक्ष वेणुनाथ आहे , शहराध्यक्ष जुबेर मुसानी रवींद्र भुजाडी, दताञय खेमनर,भरत आढाव, बाळासाहेब गाडाळ,सतिष तरवडे,सखाहरी दिघे,चेतन मोरे,दिलीप काळे फिरोज मन्सुरी अकिल शेख, अक्षय गायकवाड, सतीश तरवडे, योगेश खामकर आदिनाथ जाधव उमेद शेख,विक्रम चव्हाण अकिल पठाण आशिष वाकोडे, दत्तात्रय आरखडे, इत्यादी प्रहार सैनिक उपस्थित होते. यावेळी रोटरी क्लब ब्लड बँक राहुरी व तिने डॉ.कोळसे डॉ. पटेल यांचे सहकार्य लाभले.



