नगर शहरात रंगणार कराटेचा महा मुकाबला . . .
देशातील 15 राज्यांतील खेळाडू रिपब्लिक कप साठी भिडणार !
नगर शहरात रंगणार कराटेचा महा मुकाबला . . .
देशातील 15 राज्यांतील खेळाडू रिपब्लिक कप साठी भिडणार !
एस डब्ल्यु न्यूज / वृत्तसेवा
अहिल्यानगर : इंडियन ओपन रिपब्लिक कप कराटे स्पर्धेचा दुसरा सीझन येत्या 19 जानेवारी 2025 रोजी अहिल्यानगर येथे रंगणार आहे. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत 15 राज्यांतील खेळाडू आपले कौशल्य दाखवण्यासाठी सहभागी होणार आहेत. स्पर्धेचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स ओके ओटीटी प्लॅटफॉर्मवर केले जाणार आहे, ज्यामुळे देशभरातील प्रेक्षकांना कराटेचा थरार पाहता येईल.
स्पर्धेचे आयोजन युथ कराटे फेडरेशन व स्पोर्ट्स ओके यांच्या विद्यमाने करण्यात आले आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि कराटे खेळाला राष्ट्रीय पातळीवर अधिक प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती आयोजक साहिल सय्यद आणि सबिल सय्यद यांनी दिली.
स्पर्धेच्या विजेत्यांसाठी रोख रक्कम बक्षीस ठेवण्यात आले आहे. मागील वर्षी झालेल्या सीझन 1 मध्ये महाराष्ट्र संघाने विजेतेपद पटकावले होते, तर कर्नाटक व गुजरात यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान मिळवले होते. मागील वर्षी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले होते. आणि विविध मान्यवरांनी त्यांची उपस्थिती दर्शवली होती. यावर्षीही खासदार निलेश लंके यांनी स्पर्धेसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या असून. खेळाडूंसाठी ही एक मोठी संधी ठरणार आहे. यंदा कोणता संघ विजयी होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
युथ कराटे फेडरेशन आणि स्पोर्ट्स ओके यांची ही स्पर्धा कराटे खेळाला नवी दिशा देईल आणि नवोदित खेळाडूंना प्रेरणा देईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.