Breaking
ब्रेकिंग

तो रक्तदानावर प्रेम करत गेला…तीन तीन महिन्यांनी रक्तदान करत गेला

प्रेम दिनी गणेश शिंगारेने ११० वेळी रक्तदान करण्याचा विक्रम केला

0 3 9 0 3 9

तो रक्तदानावर प्रेम करत गेला…तीन तीन महिन्यांनी रक्तदान करत गेला

प्रेम दिनी गणेश शिंगारेने ११० वेळी रक्तदान करण्याचा विक्रम केला

प्रतिनिधी :- पंकज पाटील

अमळनेर : त्याने सातत्याने समाजसेवेवर प्रेम केले….रक्तदानावर प्रेम करत आला … दर तीन महिन्यांनी तो रक्त देतोच…१४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे ला अमळनेर नगरपरिषदेचा पाणी पुरवठा विभागाचा फिल्टर इन्स्पेक्टर गणेश शिंगारे याने रक्तदानाचा ११० चा आकडा पार केला. गणेश शिंगारे यांचे वय ४५ वर्षे असून वयाच्या १८ व्या वर्षांपासून वाढदिवसापासून त्यांनी रक्तदानाला सुरुवात केली. दर तीन महिन्यांनी रक्तदान करता येते म्हणून ते आजपर्यंत ते सातत्याने तीन महिन्यांनी रक्तदान करत आले आहेत. एकदा त्यांच्या मित्राला सर्पदंश झाला होता. त्याला उपचारासाठी धुळे येथे दाखल केले होते. रक्ताची गरज असल्याने त्याच्यासाठी रक्तदान केले. अचानक पुन्हा १२ दिवसांनी मित्राची भाची गंभीर आजारी पडली. तिला जळगाव येथे रक्ताची गरज होती म्हणून खोटे बोलून रक्तदान केले. पण खूप त्रास झाला…डोळ्यासमोर अंधारी आली. डॉक्टरांनी सलाईन लावून ग्लुकोज पाजून बरे केले मात्र आठवडाभर अशक्तपणा जाणवला होता. गणेश शिंगारे यांचे कोरोना काळात अतिशय उत्कृष्ट काम होते. कोविड सेंटर ला त्यांची ड्युटी होती. त्या काळात नातेवाईक देखील जवळ येत नसल्याने वृद्ध किंवा काही लोक व्यथित होऊन खचून जात होते ,घाबरून जेवण सोडून देत होते अशा वेळी गणेश शिंगारे यांनी स्वतःच्या हाताने खाऊ घालून रुग्णांचा मुलगा म्हणून कर्तव्य पार पाडले होते. त्यांच्याशी गप्पा मारून त्यांना धीर देत बरे केले होते. तत्कालीन प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी त्यांचा विशेष सन्मान केला होता. कोविड काळात देखील त्यांनी रक्तदान केले होते. रक्तदात्याना रक्त मिळवण्यासाठी मिळणारी सवलत अथवा सूट त्यांनी कधीच स्वतःसाठी वापरली नाही. त्यांनी नेहमी इतरांसाठी वापरली. त्यांनी आणि त्यांची पत्नी किरण शिंगारे यांनी दोघांनी देहदानाचा संकल्प केला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे