Breaking
ब्रेकिंग

परंडा येथील देऊळगाव गणेश गड येथे गणेश जयंती निमित्त वारकऱ्यांना नशा मुक्त भारत आणि सशक्त भारत अभियान बद्दल मार्गदर्शन

0 3 9 0 7 2

परंडा येथील देऊळगाव गणेश गड येथे गणेश जयंती निमित्त वारकऱ्यांना नशा मुक्त भारत आणि सशक्त भारत अभियान बद्दल मार्गदर्शन

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ३/ परंडा तालुक्यातील देऊळगाव, गणेशगड येथे गणेश जयंती निम्मित श्री वृंदावन महागणपती मंडळात गणेश जयंती साठी आलेल्या वारकऱ्यांना नशा मुक्त व सशक्त भारत अभियानचे ब्रँड अँबेसेडर महेश वैद्य यांनी सर्व उपस्थितांना नशा मुक्त भारत अभियान आणि सशक्त भारत अभियाना बद्दल मार्गदर्शन केले. वारकरी संप्रदायास सशक्त आणि निरोगी राहण्यासाठी योग्य तो व्यायाम कसा प्रकारे करायचा याबद्दल प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र ही भूमी साधू संतांची आहे आणि ज्ञानेश्वर माऊली पासून आजच्या संत महंत या पर्यंत सर्वांनी समाज प्रबोधन त्या त्या काळानुसार त्या काळातील समाज व्यवस्थेनुसार मोठ्या प्रभावीपणे केले. आज आपल्या देशाला नशा मुक्त आणि सशक्त करण्याची खूप गरज आहे. त्यासाठी वारकरी संप्रदायाने स्वतः सशक्त आणि नशा मुक्त राहिले तर त्याचा आदर्श सबंध भारत देशात नव्हे तर जगात घेतील. कारण काही समस्या जागतिक समस्या आहेत. नामा मध्ये जे सामर्थ्य आहे त्याने आत्मशुद्धीकरण होते पण शरीर हे व्यायामानेच सशक्त आणि निरोगी राहते असे यावेळी मार्गदर्शन करताना महेश वैद्य यांनी सांगितले. शरीर बनवताना सर्वांना सारखा न्याय दिला आहे आणि ते पवित्र शरीर घेऊन माणूस जन्मला येतो आपले देह एक मंदिर आहे ते कसे ठेवायचे हे आपल्याच हातात आहे असेही यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले.

यावेळेस नाना महाराज पांडेकर यांच्या आशीर्वादाने आणि अशोक काका कुलकर्णी यांच्या सहकार्याने हा वारकरी संप्रदायास नशा मुक्त भारत अभियान आणि सशक्त भारत अभियानाचा सामाजिक उपक्रम संपन्न झाला. आणि याची वारकऱ्यांना सशक्त राहण्यासाठी व्यायामाची खूप गरज आहे आणि त्या माध्यमातून सेवा घडल्यास मला खूप आनंद होईल अशी भावना महेश वैद्य यांनी व्यक्त केली. गणेश जयंती च्या पवित्र दिनी अशा प्रकारचे वारकरी संप्रदायस संबोधित करण्याचे भाग्य लाभले त्याबद्दल नाना महाराज पांडेकर आणि समस्त वारकरी संप्रदायाचे महेश वैद्य यांनी आभार मानले.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे