Breaking
ब्रेकिंग

पक्षीगणना : महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरात पक्ष्यांच्या संख्येत वाढ

जिकडे तिकडे पक्ष्यांचा किलबिलाट

0 3 9 0 2 7

पक्षीगणना : महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरात पक्ष्यांच्या संख्येत वाढ

जिकडे तिकडे पक्ष्यांचा किलबिलाट

राहुरी वृत्तसेवा / प्रतिनिधी :  जावेद शेख

सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेमार्फत कृषी विद्यापीठ परिसरात पक्षी गणना करण्यात आली पक्षी गणण्याचे यंदाचे सलग अकरावे वर्ष होते यंदा 4096 पक्षी आढळे
राष्ट्रीय पक्षी मोराच्या संख्येत 65 ने वाढ झाली. यंदा 90 मोर आढळून आले. घार घुबड चिमणी यांच्या संख्येत घट झाली तर कावळा पोपट साळुंकी बुलबुल यांच्या संख्येत वाढ झाली.
प्रत्येक वर्षात जानेवारी महिन्यात पक्षी गणना केली जाते. त्यासाठी तेरा ठिकाणे निश्चित केली जातात महात्मा फुले कृषी विद्यापीठातील परिसर, शालेय परिसर, धर्माडी टेकडी, देशमुख वस्ती शेडगे वस्ती, मुळा धरण पूर्व व पश्चिम कालवा,फार्म कॉटर, सडे रोड आदींचा समावेश असतो. सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे सचिव डॉ महानंद माने यांच्या प्रेरणेतून विद्यालयात विविध उपक्रम राबवले जाता. त्या उपक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना निसर्गाची आवड निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून विद्यापीठ परिसरा मध्ये 51 विद्यार्थिनी व 65 विद्यार्थी, 8 अध्यापक व पालक असे मिळून 129 जणांनी पक्षी गणनेत सहभाग नोंदवला .
विद्यार्थ्यांना निसर्ग जवळून अनुभवता यावा,पक्षांची ओळख व्हावी आणि पक्षांबददल मनात प्रेम निर्माण व्हावे या हेतून हरित सेनेतर्फे हा उपक्रम राबविण्यात येतो. पक्षी गणनेत भल्या सकाळी पक्षांची रंगीबेरंगी दुनिया पाहून विद्यार्थी भारावून गेले.फोटो काढून,डोळ्यात साठवून त्यांनी आठवणी जपल्या.सर्वांचे आकर्षण होते.किंगफिर्शर अर्थात खंड्या.
कृषी विद्यापीठात पक्षांची संख्या चांगली आहे.विविध बागा,पाटपाणी आणि शिकारी पासून संरक्षण यामुळे पक्षांना कृषी विद्यापीठ म्हणजे एक सुरक्षीत अभायारण्य आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील, डाॅ.प्रमोद रसाळ, डॉ महानंद माने, महेश घाडगे, प्राचार्य अरुण तुपविहीरे, उपप्राचार्य बाळासाहेब डोंगरे,पर्यवेक्षक मनोज बावा, प्रा.जितेंद्र मेटकर आदींनी या उपक्रमाचे कौतुक केले.हरित सेनेचे सचिव तुकाराम जाधव यांनी नियोजन केले. गटप्रमुख म्हणून
अनुष्का अशोक शिंदे, मानसी अशोक जोहरे, श्रेया विवेक टाकते, करण मोगल कार्तिकी , ओंकार संतोष कोराळे,साई किरण , हिमेश थिगळे, जावळे, प्रथम ,विनायक जाधव, कार्तिकी सोनवणे, मृणाल ननवरे, गौरव पठारे , सार्थक ढगे यांनी काम केले.
श्री.संतोष जाधव, श्रीमती वंदना भांगरे मॅडम
, श्री ठाकूर सर, श्रीमती वंदना भांगरे ,श्री संदीप कुंभारे सर, श्री अविनाश यादव,संतोष जाधव ,पालक रविंद्र आंधळे आदींनी या उपक्रमात सहभाग नोंदवला

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे