महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या विदर्भ समन्वयक म्हणून नरेश गेडाम-पाटील यांची नियुक्ती

महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या विदर्भ समन्वयक म्हणून नरेश गेडाम-पाटील यांची नियुक्ती
प्रतिनिधी : पंकज पाटील
जळगाव :- राज्यात महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी रात्रंदिवस कार्य करण्यात येत असून याज कार्यात अधिकाधिक भर पडावी यासाठी महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून नियुक्त्या देण्यात येत आहेत. विदर्भात शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करताना दिसून येत आहे.अवकाळी पावसामुळे,बोगस बियाणे, खते व प्रशासनच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मुळचे मोर्शी जिल्हा अमरावती हल्ली मुक्काम उपराजधानी नागपूर येथील नरेश पांडुरंगजी गेडाम-पाटील यांची विदर्भ समन्वयक म्हणून संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व शेतकरी नेते सुनील देवरे यांनी आज रोजी नियुक्तीपत्र दिले.
श्री गेडाम यांनी शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्रभर काम केलेले असून त्यांचे शिक्षण स्थापत्य अभियंता असे असून ते महाराष्ट्र शासनाच्या सेवेत कार्यरत होते त्यांनी अभियंता म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात काम केले असून नुकतेच सेवानिवृत्त झालेले आहेत प्रथम शेतकरी असल्याने शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास हाच माझ्यासाठी महत्त्वाचा आहे म्हणून मी संघटनेला पूर्ण वेळ देणार आहेत.
तसेच सिव्हिल इंजिनियर असून शेतीचा त्यांना दांडगा अनुभव आहे.त्यांचा शेतकरी कष्टकरी जनतेशी तळागाळा पर्यंत संपर्क आहे. फळशेती, फुलशेती,तसेच शेती यांत्रिकीकरण,शेतकऱ्यांकरिता शेती उत्पादकता, पणन व विपणन याबाबत त्यांना सखोल माहिती असल्याने शेतमालाला उत्कृष्ट बाजारभाव मिळवून देण्यास खूप मदत होईल. त्यांचा संपुर्ण महाराष्ट्र भर संपर्क असल्याने त्यांच्या नियुक्तीमुळे शेतकऱ्यांना व संघटनेस मोलाचे भरीव मार्गदर्शन होईल. सद्यःस्थितीत विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होण्यास मोलाचे सहकार्य होणार असून आपण एक शेतकरी पुत्र असून आपण शेती व शेतकऱ्यांच्या हितासाठी परिसरातील शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळणे कामी काम करण्यासाठी विदर्भ समन्वयक पदावर व विदर्भातील सर्व विभागांकरिता नियुक्त करण्यात येत असल्याचा उल्लेख असून संघटनेला मजबूत करण्यासाठी विदर्भ प्रमुख आकाश सुखदेवे यांच्या सोबत संघटनेचे ध्येय धोरणे व विचार सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कामगार वर्ग यांच्यापर्यंत पोहचून शेतकरी हीत जपणार अशी अपेक्षा राष्ट्रीय अध्यक्ष सुनील देवरे यांनी व्यक्त करून पुढील कार्यकारणी पंधरा दिवसाच्या आत घोषित करून संघटनेच्या कार्यालयात पाठवावी असे नमूद केलेले आहे तसेच ज्यांना ज्यांना संपूर्ण महाराष्ट्रात संघटनेत सामील होऊन शेतकऱ्यांसाठी कार्य करायचे असेल अशांनी 9890875238 या नंबरवर संपर्क करावा असे सांगितले.
श्री .नरेश गेडाम यांची विदर्भ प्रमुख आकाश सुखदेवे व विदर्भातील संघटनेचे सर्व कार्यकर्ते सदस्य यांनी निवडीबद्दल अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिलेले आहेत.