Breaking
ब्रेकिंग

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत करावा ; कर्मचारी पगाराअभावी आर्थिक अडचणीत

0 8 6 5 0 8

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत करावा ; कर्मचारी पगाराअभावी आर्थिक अडचणीत

नागपूर /    प्रतिनिधी 

नागपूर : एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत होत नसल्याने कर्मचाऱ्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते . परिणामी कर्मचारी पगारा अभावी चिंतेत असतात .कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत करावेत या संदर्भात महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या विभागीय सचिव श्रीमती मनिषा कालेश्वर यांनी
संबंधीत विभागाला विनंती केली आहे .
श्रीमती मनिषा कालेश्वर यांनी म्हटले आहे की,महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचाऱ्यांचे वेतनाबाबत महामंडळाचे कर्मचारी अत्यंत तुटपुंज्या पगारात आपले जीवन जगत असतात आणि आत्ताच्या परिस्थितीत जो शासनाने कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत त्यांचे हक्काचे वेतन देण्याचे कबूल केले त्यासाठी सुद्धा शासनाला वारंवार मागणी केली जाते परंतु इतर विभागाच्या बाबतीत ही परिस्थिती नाही . तसेच महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस सन्माननीय श्रीरंग बर्गे साहेब कर्मचाऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या वेतनाच्या बाबतीत त्यांच्या आर्थिक परिस्थिती त्यांच्या अडचणी आणि सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाला वेळोवेळी कर्मचाऱ्यांच्या हिताचे सकारात्मक निवेदन असते .

महाराष्ट्र शासनाला कळकळीचे निवेदन आहे की, एसटी कर्मचारी हा कमी वेतनामध्ये आर्थिक परिस्थितीत त्यांच्या कौटुंबिक अडचणी हे अत्यंत कमी वेतनामध्ये भागवत असतात तरीसुद्धा एसटी कर्मचारी हे समाधानाने जीवन जगतात . परंतु शासनाने दिलेल्या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांचे वेतन हे वेळच्यावेळी म्हणजेच सात तारखेला त्यांचे महिनाभर हक्काचे वेतन त्यांना वेळेवर मिळावे ही माझी महाराष्ट्र शासनाला कळकळीची विनंती आहे की जेणेकरून कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक अडचणी वेळीच दूर होतील .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे