श्री मुम्मका सुदर्शन यांनी जपली सामाजिक संवेदनशीलता । बालघर प्रकल्प च्या सेवाकार्याचे केले कौतूक

श्री मुम्मका सुदर्शन यांनी जपली सामाजिक संवेदनशीलता । बालघर प्रकल्प च्या सेवाकार्याचे केले कौतूक
अहिल्यानगर / प्रतिनिधी
समाजाप्रती असलेली संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी जपत अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी त्यांची कन्या द्रुतश्री हिचा वाढदिवस रुद्रपूजा फाउंडेशन संचलित बालघर प्रकल्प येथील निवासी बालकांसमवेत अत्यंत साधेपणाने व आपुलकीच्या वातावरणात साजरा केला.
याप्रसंगी पोलिस अधीक्षक सुदर्शन यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी बालकांशी मनमोकळा संवाद साधत त्यांना मिष्ठान्न भोजन दिले. या अनोख्या उपक्रमामुळे बालकांच्या चेहर्यावर कमालीचा आनंद फुलला. त्यांना कुटुंबाच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा स्पर्श अनुभवता आला. कार्यक्रमादरम्यान पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी बालघर प्रकल्पामार्फत वंचित, निराधार व गरजू बालकांसाठी सुरू असलेल्या सेवाकार्याचे मनापासून कौतुक करून समाजातील प्रत्येक घटकाने सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना मदतीचा हात दिला पाहिजे असे मत व्यक्त केले. रुद्रपूजा फाउंडेशनच्या वतीने पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व त्यांच्या संपूर्ण परिवाराचे आभार मानले, तसेच द्रुतश्री हिला वाढदिवसानिमित्त निरोगी, यशस्वी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.
खर्या अर्थाने वाढदिवसाचा आनंद तोच, जो इतरांच्या चेहर्यावर हास्य फुलवतो, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या वेळी पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्यासह त्यांचे कुटुंबीय, बालघर प्रकल्पाचे संस्थापक युवराज गुंड, संजय भालेराव, अमोल भोईटे, संदीप भूकन, उद्धव गुंड, रुक्मिणी ठोंबरे, जनार्दन नजन आदी उपस्थित होते.


