Breaking
ब्रेकिंग

अमळनेरात शिवसेनेतर्फे २१ रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन*

0 8 6 7 1 8

*अमळनेरात शिवसेनेतर्फे २१ रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन*

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर :राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार राज्यभरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करावयाचे असून त्यानुसार अमळनेर शहरातही शिवसेनेतर्फे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन २१ रोजी करण्याचे योजिले आहे.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यास ऑपरेशन सिंदूर मोहिमेतून चोख प्रत्युत्तर देऊन पाकिस्तानचे कंबरडे मोडून ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या भारतीय सैन्यदलाच्या स्मरणार्थ शिवसेनेतर्फे दि. २१ मे, २०२५ रोजी सकाळी ठिक ८.०० वाजता तिरंगा चौक ते महाराणा प्रताप चौक पर्यंत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर तिरंगा रॅलीत चारचाकी वाहनावर भारत मातेची एक प्रतिमा, मोटारसायकलवर तिरंगा झेंडा लावून रॅलीदरम्यान देशभक्तीपर गीते गायिले जाणार आहेत.

सदर तिरंगा रॅलीमध्ये सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक व तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजक शिवसेना तालुका प्रमुख सुरेश अर्जुन पाटील, शहर प्रमुख संजय कौतिक पाटील व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 7 1 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे