दहिगाव येथील मंजूर सबस्टेशन काम लवकर सुरू व्हावे
दहिगाव येथील मंजूर सबस्टेशन काम लवकर सुरू व्हावे
नगर / विशेष प्रतिनिधी : शिवहरी म्हस्के
नगर तालुक्यातील दहिगाव येथे ३३ किव्ही लाईन द्वारे मंजूर सब स्टेशन काम करण्यासाठी गट नंबर ५० मधील ८.६७ हेक्टर आर पैकि आपल्या विभागला ६० आर जागा अहिल्यानगर जिल्हाधिकारी मान्यतेने आपल्या महावितरण कंपनी कडे वर्ग अंतिम मंजूर झाली आहे. साताबारा उतार्यावर लवकरच तो बदल दिसेल सदर क्षेत्र आपल्या विभागाकडे घेण्याची प्रशासकीय कार्यवाही करावी अशी मागणी दहिगाव, साकत, शिराढोण, वाटेफळ, साकत बुद्रुक वडगाव तांदळी आदी गावातील ग्रामस्थांनी लेखी निवेदन द्वारे केली आहे.
दहिगाव, साकत, शिराढोण, साकत बुद्रुक, वडगाव तांदळी, वाटेफळ,आदी पंचक्रोशीतील नागरीकांना विद्युत पुरवठा योग्य रितीने होत नाही. शेतातील पिके पाणी असुन विद्युत पुरवठा होत नसल्याने पिके धोक्यात आली आहे. तरी दहिगाव येथील ३३किव्ही अंर्तगत मंजूर सबस्टेशन काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी आज निवेदन द्वारे केली आहे. या कामासाठी निधी उपलब्ध होण्यासाठी नगर श्रीगोंदाचे आमदार विक्रम पाचपुते व तसेच अहिल्यानगर जिल्हाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची लवकरच शिष्ट मंडळ भेट घेऊन हा प्रश्न निकाली निघणार आहे.
या वेळी युवा नेते दादासाहेब दरेकर,माजी सरपंच अभिलाषा घिगें, माजी संचालक जयवंत शिंदे, माजी सरपंच सुनील म्हस्के लक्ष्मण वाघ, सुदाम बनकर, श्रीराम वारे, अनशाबापु म्हस्के, दत्तात्रय बनकर, सरपंच बाळासाहेब अमृते,बंडू शिंदे, शुभम भोगाडे,ॲड पोपट म्हस्के, मोहन निमसे,राजेंद्र हंबर्डे, दत्तात्रय शिंदे, महेश म्हस्के, सखाराम म्हस्के, गणेश हिंगे, गोवर्धन म्हस्के, पाराजी माने आदी मान्यवर उपस्थित होते .
महसूल विभागाकडून विज वितरण कंपनी कडे जागा हस्तातरण 22 जानेवारी ला झाले आहे.या साठी आपण दादासाहेब दरेकर आणि परिसरातील कार्यकर्त्यांसह पालकमंत्री राधाकृष्ण् विखे पाटिल यांना 6 जानेवारी ला भेटून मागणी केली त्याचं ठिकाणी पालकमंत्री साहेबानी जिल्हाधिकाऱ्यांना जागा वर्ग करण्यासाठी आदेश दिले.परंतु काही लोक त्यांचे राजकारण करत आहे. आणि कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे.हे दुर्दैवी आहे
दहिगाव येथील नवीन सबस्टेशन मंजुरी आणि उभारणीसाठी साठी आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब आणि आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या माध्यमातून पाठपुरावा करणार आहे. – – – अभिलाष घिगें
(मा.सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती नगर)बाबुर्डी सबस्टेशन कडून काही भाग जोडण्यात येईल. तर काही भाग नारायणडोह सबस्टेशन कडून जोडुन
रुईछत्तीसी सबस्टेशन लोड कमी करून रुईछत्तीसी सबस्टेशन अंतर्गत गावातील थ्री फेज कनेक्शन लोड बाबतीत योग्य उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहे. – – योगेश चव्हाण
(कार्यकारी अभियंता महावितरण अहिल्यानगर)