एमआयटी एडीटीचे’ हाँरिझॉन एआय हँकेथाँन मध्ये मधुर पाटील ची देदित्यमान कामगिरी

एमआयटी एडीटीचे’ हाँरिझॉन एआय हँकेथाँन मध्ये मधुर पाटील ची देदित्यमान कामगिरी
प्रतिनिधी :- पंकज पाटील
पुणे :- एमआयटी आर्ट डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ कम्प्युटरिंगच्या (एमआयटी एसओसी) मधुर पाटील ( अमळनेर) आणि त्याच्या टीमने हाँरिझाँन एआय हाँकेथाँन या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवले. अमेरिकेतील मियामी विद्यापीठाच्या वतीने आयोजित या स्पर्धेत ‘सिकलसेल डिटेक्टर’ या नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी अमळनेरचा मधुर पाटील, अनुराग अहिरराव, अर्णव बुळे,आणि निधी फोफळीये यांचा समावेश असल्याने त्यांच्या संघाने तिसरा क्रमांक पटकावत 1000 अमेरिकन डॉलरचे पारितोषिक जिंकले आहे. ‘सिकल सेल डिटेक्टर’ हा एक कृत्रिम बुद्धिमत्तेवर( ए आय) आधारित उपाय असून जो सिकल सेल आजाराचे वेळीच आणि अचूक निदान करण्यासाठी तयार केला आहे. विशेषत: दुर्गम आणि आरोग्य सुविधांचा अभाव असलेल्या भागांमध्ये हा प्रकल्प मोठी मदत करू शकतो. एआय च्या मदतीने निदान आणि उपचार पद्धती उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामाचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी प्रा.डॉ. रंजना काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्जनशीलता आणि तांत्रिक कौशल्यांचे प्रदर्शन करत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तुत्वाची छाप पडली.
विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा.डॉ. श्री.मंगेश कराड. कुलगुरू प्रा. डॉ.राजेश एस.प्र. कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजारी. डॉ.मोहित दुबे, सचिव डॉ. महेश चोपडे डॉ.सुरेश कापरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विशेष बाब म्हणजे अमळनेरचा मधुर पाटील हा पाटील ऍग्रो(रसमंजू काँम्लेक्स) चे संचालक श्री.प्रशांत तुळशिराम पाटील ( चौबारी)आणि सौ.नम्रता पाटील यांचा चिरंजीव असून त्याने दैदिप्यमान यश संपादन केले. त्याचे सर्व समाज बांधव ,मित्र परिवार, प्रताप मिल कंपाऊंड परिसरातील सर्व रहिवासी यांनी कौतुक केले.