Breaking
ब्रेकिंग

विकसित कृषि संकल्प अभियानाचा सांगता समारोप केव्हीके दहिगाव-ने येथे संपन्न

0 4 0 3 8 5

विकसित कृषि संकल्प अभियानाचा सांगता समारोप केव्हीके दहिगाव-ने येथे संपन्न

प्रतिनिधी : प्रविण देशमुख

कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार, नवी  दिल्ली द्वारा संपूर्ण भारत देशात केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे संकल्पनेतून कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून खरीप हंगाम पुर्व विकसित कृषि संकल्प अभियानाचे आयोजन दिनांक २९ मे ते १२ जून २०२५ दरम्यान करण्यात आले होते. या अभियानाचा सांगता समारोप श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने, येथे दिनांक १२ जून २०२५ रोजी पार पडला. या सांगता समारंभास, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी चे कृषि विस्तार शिक्षण संचालक डॉ. जी. के. ससाणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने, राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था बारामती, महात्मा फुले कृषि विद्यापीठ तसेच कृषि विभाग व आत्मा अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित कृषि संकल्प अभियान कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने च्या कार्यक्षेत्रातील ७ तालुके जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, नगर, पाथर्डी, शेवगाव व नेवासा मधील एकूण ९० गावांमध्ये राबविण्यात आले. सदर अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. आ. नरेंद्रजी घुले पाटील, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू, डॉ. शरद गडाख, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अहिल्यानगर सुधीर बोराळे तसेच आत्मा अहिल्यानगर चे प्रकल्प संचालक प्रदीप लाटे यांचे मार्गदर्शन लाभले. कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने व इतर सहभागी सस्थांच्या शास्त्रज्ञांच्या दोन टीम तयार करून निवडक गावातील शेतकऱ्यांना कृषि तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सदर पंधरा दिवसाच्या अभियानात शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात नोंदवला. या अभियानादरम्यान शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची प्रात्याक्षिके त्यांच्या शेतावर जाऊन देण्यात आली तसेच कृषि रथ गावोगावी फिरवून कृषि तंत्रज्ञानाविषयी जनजागृती करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या सांगता समारंभास राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था बारामती चे शास्त्रज्ञ डॉ. बसवराज पाटील, डॉ. के. एम. बोरय्या, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे डॉ. ससाणे, डॉ. चवई, डॉ. अतार, ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे उप-शेतकी अधिकारी श्री. म्हस्के, तालुका कृषि अधिकारी शेवगाव श्री. अंकुश जोगदंड, केव्हीके दहिगाव-ने चे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कौशिक व सर्व शास्त्रज्ञ आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण निबे यांनी केले तर श्री माणिक लाखे यांनी आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 3 8 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे