वरवंडी चे सुपुत्र ह.भ.प.नामदेव (महाराज ) बाळासाहेब कोहकडे यांचे अखंड हरिनाम सप्ताहात किर्तन

वरवंडी चे सुपुत्र ह.भ.प.नामदेव (महाराज ) बाळासाहेब कोहकडे यांचे अखंड हरिनाम सप्ताहात किर्तन
राहुरी तालुका जावेद शेख
राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने वरवंडी गावचे सुपुत्र हरिभक्त परायण नामदेव बाळासाहेब कोहकडे महाराज यांची दुसऱ्या दिवसाची किर्तन सेवा मोठया उत्साहात पार पडली ह.भ.प नामदेव महाराज कोहकडे यांना घडविण्यात आजी लक्ष्मीबाई मंज्याबापु कोहकडे,वडिल बाळासाहेब ‘आई अर्चना , चुलते जालींदर चुलती आरती व काका अशोक कल्हापुरे यांनी मोठे परिश्रम घेतले वरवंडी गावच्या इतिहासात प्रथमच वरवंडीचे सुपुत्र किर्तनकार झाल्याने वरवंडी करांना हि बाब मोठ्या अभिमाना ची आहे गावच्या किर्तनकाराचे गावकऱ्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले.पत्रकार जावेद शेख, पत्रकार रमेश जाधव, जगदीश भालेराव,परभत बरे, सुनिल पवार सुनिल भालेराव रविंद्र भालेराव नारायण शिंदे अभिजित शिंदे चेतन पवार प्रथमेश जाधव, नवनाथ ढगे,नंदु भालेराव,यांच्या हस्ते नामदेव महाराजांचा भव्य सत्कार करण्यात आला.

वरवंडी येथे अखंड हरीनाम सप्ताह सुरू असुन हा पारायण सोहळा ह भ प मुळे महाराज ,गोरक्षनाथ ढगे, त्रिबक पाटील अडसुरे ,शंकर ढगे, आप्पा ढगे , केशव अडसुरे , यांचे मार्गदर्शनाखाली सुरू असुन या साठी रमेश कदम .जालीदर ( महाराज ) अडसुरे, निवेदक, साईनाथ कदम, राजु ढगे कैलास ढगे विजय कदम दिगंबर ताकटे नितीन ढगे, ईश्वर अडसुरे इत्यादीचे विषेश सहकार्य लाभत आहे.
नामदेव महाराज कोहकडे यांनी त्यांचे वारकरी संप्रदायाचे शिक्षण ज्ञानाई वारकरी संप्रदाय शिक्षण संस्था वांबोरी येथे गुरुवर्य ईश्वर महाराज कदम शास्त्री यांचे कडे पुर्ण केले असून नामदेव महाराज कोहकडे यांचे किर्तन सेवा श्रवणासाठी वरवंडी गावासह पंचक्रोशीतुन मोठा जन समुदाय जमला होता त्यांचे किर्तन सेवेने लोक भाराऊन गेले होते .



