Breaking
ब्रेकिंग

शेकापच्या जिल्हा चिटणीसपदी सुरेश खैरे यांची नियुक्ती

0 3 9 0 7 2

शेकापच्या जिल्हा चिटणीसपदी सुरेश खैरे यांची नियुक्ती

अलिबाग / प्रतिनिधी : राजेश बाष्टे

शेतकरी कामगार पक्षाच्या रायगड जिल्हा चिटणीसपदी पाली येथील सुरेश नामदेव खैरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षाच्या मुख्य पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत रायगड जिल्हा चिटणीसपदासाठी सुरेश खैरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सुरेश खैरे हे शेकापचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. त्यांनी अनेक पदे यशस्वीरित्या भुषविली आहेत. शेतकरी कामगार पक्षासाठी त्यांनी नेहमीच झोकून काम केले आहे. म्हणूनच पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर जिल्हा चिटणीसपदाची जबाबदारी सोपविली आहे.

यावेळी बैठकीसाठी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील, रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, माजी आमदार बाळाराम पाटील, उद्योगपती जे. एम. म्हात्रे, अतुल म्हात्रे, ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, अलिबाग नगरीचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी नगरसेवक प्रदीप नाईक, अनिल चोपडा, पी. डी. पाटील, अरविंद म्हात्रे, सर्व तालुका चिटणीस आणि जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
शेतकरी कामगार पक्षाने माझ्यावर फार महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. शेतकरी कामगार पक्षाची ध्येय धोरणे तळागाळात रुजविण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी उभारणार आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धात रायगड जिल्ह्यात सर्व तालुक्यांचा दौरा करणार असून त्यानंतर कार्यक्षम पदाधिकाऱ्यांच्या नेमणूक करण्यात येतील. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष अधिक बळकट करण्याचा यशस्वी प्रयत्न करणार असून, पक्षाने केलेली माझी निवड सार्थ असल्याचे सिद्ध करणार आहे, असे नवनिर्वाचित रायगड जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी सांगितले.

4/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे