Breaking
ब्रेकिंग

शिर्डी ते पंढरपूर पायी दिंडीचे आज करमाळा शहरात आगमन ; सालाबाद प्रमाणे देवी हार्डवेअर अँड प्लायवूड व मित्रपरिवार यांच्याकडून दिंडीच्या जेवणाचे आयोजन

0 8 6 5 2 1

शिर्डी ते पंढरपूर पायी दिंडीचे आज करमाळा शहरात आगमन ; सालाबाद प्रमाणे देवी हार्डवेअर अँड प्लायवूड व मित्रपरिवार यांच्याकडून दिंडीच्या जेवणाचे आयोजन

करमाळा /  प्रतिनिधी:  स्नेहल कटारिया

करमाळा: दि. १७/ स्वामी काशीकानंदजी महाराज यांची शिर्डी ते पंढरपूर जाणाऱ्या पायी दिंडीचे आज संध्याकाळी संध्याकाळी करमाळा शहरात आगमन होणार आहे. सालाबाद प्रमाणे यावर्षीही या दिंडीचे जेवणाचे आयोजन देवी प्लायवूड अँड हार्डवेअर व मित्रपरिवार यांच्या तर्फे करण्यात आले आहे. या दिंडीमध्ये जवळपास १,१०० च्या वर वारकरी असतात.

अभिषेक देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार सलग ५ वर्षापासून देवी परिवार व मित्रपरिवार यांच्याकडून दिंडीची सेवा करण्यात येत आहे. तसेच वारकऱ्यांसाठी मुक्कामाची झोपण्याची व आंघोळीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा जपत “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात दिंडीचे स्वागत करण्यात येते. या प्रसंगी देवी परिवारातील सर्व सदस्य, मित्रपरिवार तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. यावेळी पंढरीच्या विठुरायाच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी देवी परिवार व मित्र परिवाराकडून प्रार्थना करण्यात येते. तसेच देवी परिवार व मित्र परिवाराकडून शहरातील भाविकांना प्रसादासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

सदर दिंडीची जेवणाची व राहण्याची व्यवस्था नालबंद मंगल कार्यालय, नगर रोड येथे करण्यात आलेली आहे. जेवणाच्या अगोद भजन प्रवचनाचा आनंदही भाविकांना मिळणार आहे.

सलग ५ वर्षापासून करत आलेल्या या दिंडीची सेवा म्हणजे “वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा” या भावनेतून राबविण्यात येणारा हा उपक्रम आहे. हा उपक्रम करमाळा शहरातील सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाची परंपरा अधिक दृढ करणारा ठरत असून, भाविकांकडून या उपक्रमाचे स्वागत होत आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे