विद्यार्थ्यांसाठी काहीही . . .दिपक पाटील
विद्यार्थ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार - - दिपक पाटील

विद्यार्थ्यांसाठी काहीही . . .दिपक पाटील
विद्यार्थ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार – – दिपक पाटील
प्रतिनिधी : पंकज पाटील
जळगाव : जळगांव जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशनचे दिपक पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यांनी वाघोदे ग्रामपंचायतीच्या निधीतील घोटाळे आणि विद्यार्थ्यांच्या व्यायाम शाळेच्या प्रकल्पाबाबत काही माहिती समोर आणली आहे. दोन वर्षांपूर्वी भूमीपूजन झालेल्या व्यायाम शाळेच्या कामाची सुरुवातच झाली नाही, याबाबत पाटील यांनी चिंता व्यक्त केली.
दिपक पाटील यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या हितासाठी लवकरच माहितीचा अधिकार अन्वये अर्ज दाखल करणार आहे . तसेच गोरगरीब मुलांची भरतीसाठी तयारी करणे आवश्यक आहे, मुलांना अनेक असुविधा समस्यांना सामोरे जावे लागत आहे .विद्यार्थ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ही दिपक पाटील यांनी आवर्जून सांगितले .
बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला प्रमुख शुभांगी ताई पाटील यांच्याशी चर्चा करताना त्यांनी विश्वास व्यक्त केला की, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी व विविध भरतीसाठी लागणाऱ्या सुविधांचा पुरवठा करण्यासाठी मी कटिबद्ध आहे . त्यांच्या या पुढाकारामुळे अमळनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावला जाईल .
खान्देशी रील्स स्टार हर्षदा महाले या अनेक विद्यार्थ्यांना सोबत घेवून राज्य अध्यक्षा शुभांगी ताई पाटील तसेच जिल्हा अध्यक्ष दिपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली लवकरच प्रवेश करून जबाबदारी घेणार आहेत .