लेखक अजिनाथ सासवडे यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन

लेखक अजिनाथ सासवडे यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन
एस डब्ल्यू न्यूज / रफिख शेख
उरण येथील वीर वाजेकर महाविद्यालयाचे मानसशास्त्र विषयाचे प्राध्यापक व खुंटेफळ (वाटेफळ) येथील रहिवाशी श्री. योगेश कुलकर्णी यांनी प्राचार्य डॉ.आमोद ठक्कर यांच्या समवेत F. Y. B. A., F. Y.Bcom आणि F. Y.Bsc च्या सत्र दोनच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारीत इंग्रजी भाषेत लिहिलेल्या Foundation of behavioural Skills-Basic Leval अर्थात पायाभूत वर्तन कौशल्य या पुस्तकाचे प्रकाशन लोणी सय्यदमीर येथील लेखक अजिनाथ सासवडे यांच्या हस्ते पार पडले.
विद्यार्थ्यांच्या वर्तनाला योग्य दिशा मिळण्यासाठी या पुस्तकाचा निश्चित उपयोग होईल असे गौरवोद्गार सरांनी यावेळी काढले. या प्रकाशनासाठी लोणी गावचे सरपंच संजय रक्ताटे सर, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र आबा वाळके, सुभाष शेठ वाळके, आजिनाथ काका बेल्हेकर, ह.भ.प. घनश्याम सासवडे, प्रा. दादासाहेब वाळके , निळकंठ काका रक्ताटे यांसह लोणी येथील अनेक मान्यवर व शिक्षणप्रेमी ग्रामस्थ प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.