Breaking
ब्रेकिंग

सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल डॉ. उद्धव शिंदे यांचा गौरव

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सन्मानचिन्ह देत केला सत्कार

0 3 9 0 2 7

सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल डॉ. उद्धव शिंदे यांचा गौरव

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सन्मानचिन्ह देत केला सत्कार

एस डब्ल्यु न्यूज / ब्युरो रिपोर्ट

अहिल्यानगर – समाजातील गरीब, वंचित, निराधार, कामगार, ज्येष्ठ नागरिकांना मदत करणारे, तसेच गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करणाऱ्या स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांचा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सामाजिक कार्याबद्दल प्रजासत्ताक दिनी सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.

पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक रॉबिन बंसल, शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, ग्रामीण पोलीस उपअधीक्षक संपत भोसले आदी उपस्थित होते.

स्नेहबंध फाऊंडेशनच्या माध्यमातून डॉ. शिंदे हे गेल्या बारा वर्षांपासून समाजातील वंचित निराधार घटकांसाठी ब्लॅंकेट, छत्री व इतर जीवनावश्यक वस्तू पुरवतात, बांधकाम कामगारांना उन्हाळ्या त टोपी देतात, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध शिबिरे आयोजित करतात. तसेच गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य, त्यांना बसण्यासाठी चटई देतात. डॉ. शिंदे यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी त्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे