जुनी पेन्शन मिळण्यासाठी संघटन होणे गरजेचे – महेश पाडेकर
शिक्षक भारती पारनेर तालुका कार्यकारणी जाहीर

जुनी पेन्शन मिळण्यासाठी संघटन होणे गरजेचे – महेश पाडेकर
शिक्षक भारती पारनेर तालुका कार्यकारणी जाहीर
राहुरी तालुका प्रतिनिधी : जावेद शेख
शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, जुनी पेन्शन योजना सर्वांना मिळण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे संघटन होणे गरजेचे आहे त्याशिवाय पर्याय नाही सर्वांना जुनी पेन्शन मिळावी शासनाने कर्मचाऱ्यांमध्ये जुनी पेन्शन संदर्भात अनेक संभ्रम निर्माण केले आहे डी.सी.पी.एस., एन.पी.एस., यु.पी.एस., सुधारित एन.पी.एस. असे विविध प्रकार पेन्शनचे आणून कर्मचाऱ्यांच्या जीवनाची खेळ चालवला आहे. शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालला आहे शिक्षकांचे प्रश्न सोडवायचे असेल तर शिक्षक भारती या शासनमान्य संघटनेचे सभासद होण्याचे आव्हान न्यू आर्ट्स कॉलेज पारनेर येथे झालेल्या सावित्री फातिमा गुणवंत शिक्षक पुरस्कार व नियुक्ती प्रदान सोहळ्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश पाडेकर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रमोद मोरे व शिक्षक भारती विनाअनुदान धोरण विरोधी कृती समितीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष जयवंत भाबड यांच्या प्रमुख उपस्थितीत सावित्री फातिमा गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अहिल्यानगर माध्यमिक शिक्षक सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक विजय पठारे, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, किशोर धुमाळ, सुधीर कानवडे यांचा शिक्षक भारती संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला प्राचार्य सोपान घाणे, सोपान गवते, विजय पठारे, बापू होळकर, ज्ञानेश्वर कवडे, पर्यवेक्षक शाम घनगाव, अशोक शिंदे, रेश्मा कळमकर, प्राचार्य मोनाली पठारे, तुषार ठुबे, भास्कर गाडगे, कैलास गाडीलकर, सुनंदा बोरुडे आदी शिक्षक प्राचार्य यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी राज्यसचिव सुनील गाडगे, जिल्हाध्यक्ष रामराव काळे, महिला अध्यक्ष रूपाली कुरुमकर,सचिन जासूद, चंद्रशेखर हासे, राहुल कानवडे, साईनाथ थोरात, दीपक फापाळे, रूपाली बोरुडे,श्रीकांत गाडगे, विजय पांडे, प्रवीण मालुंजकर आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पारनेर उच्च माध्यमिक तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यामध्ये तालुकाध्यक्ष दीपक फापाळे, मार्गदर्शक शाम घनगाव, बाबाजी लाळगे, उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, शैलेश हासे, सचिव तुषार ठुबे,गणेश पुजारी, सहसचिव मतीन सय्यद, संघटक सिद्धेश्वर जवक, गोविंद बेलोटे, कार्याध्यक्ष अशोक शिंदे, आकांक्षा शिंदे,खजिनदार सुजाता ठुबे, कोषाध्यक्ष विशाल सोबले, जया लंके, आदी पदाधिकारी नियुक्त करून त्यांना नियुक्तीपत्र देऊन पारनेर तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली शिक्षक भारती सर्व पदाधिकारी सदस्य यांनी संघटनेच्या कामाबरोबरच पर्यावरणासाठी पशुपक्ष्यांसाठी वेळ देणे गरजेचे आहे संघटनेतील पदाधिकारी प्रभावीपणे प्रबोधन करू शकतात यामुळे “मुठभर धान्य घोटभर पाणी” या उपक्रमांतर्गत सर्व गुणवंत शिक्षक व नवनियुक्त पदाधिकारी प्रमुख पाहुणे यांना मातीच्या भांड्यांचे वाटप करून पर्यावरणातील पशुपक्ष्यांचा तीव्र उन्हाळ्यात सांभाळ करण्याचे आव्हान निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांनी उपस्थित मान्यवरांना केले यावेळी पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे उपाध्यक्ष केदारी व भोजने हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिंदे यांनी केले तर आभार ठुबे यांनी मानले.