Breaking
ब्रेकिंग

जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत वीर शिवाजी महाराज तलवारबाजी ग्रुप करमाळा चे घवघवीत यश; पुणे विभागीय शालेय स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

0 8 9 6 7 5

जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत वीर शिवाजी महाराज तलवारबाजी ग्रुप करमाळा चे घवघवीत यश; पुणे विभागीय शालेय स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ०६/ महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय, सोलापूर यांच्या वतीने दि. ०५/१०/२०२६ रोजी जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धा पार्क स्टेडियम सोलापूर येथे घेण्यात आल्या. या स्पर्धेत वीर शिवाजी महाराज तलवारबाजी ग्रुप, करमाळा च्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

या स्पर्धेतून एकूण २५ खेळाडूंची पुणे विभागीय शालेय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली असून, ही करमाळ्यासाठी अभिमानाची बाब आहे.

निवड झालेले खेळाडू पुढील प्रमाणे:-

१४ वर्षांखालील मुले:-

इप्पी: रितेश बांदल, जिल्ह्यात पहिला

प्रणित पवार, जिल्ह्यात चौथा

फॉईल:-नील पवार जिल्ह्यात पहिला

सेबर: शुभम कांबळे जिल्ह्यात पहिला.

१४ वर्षांखालील मुली:-

इप्पी: पलक बेनकर, जिल्ह्यात पहिली

तेजस्विनी चव्हाण, जिल्ह्यात दुसरी

आरोही चोपडे, जिल्ह्यात तिसरी.

फॉईल: सनम शेख, जिल्ह्यात दुसरी

तनिष्क माहुले, जिल्ह्यात तिसरी

समीक्षा थोरे, जिल्ह्यात चौथी.

सेबर: आरोही बिरंगळ, जिल्ह्यात पहिली

श्रेया भोसले, जिल्ह्यात दुसरी

ओजस्वी देवकर, जिल्ह्यात तिसरी

काव्या शेलार, जिल्ह्यात चौथी.

१७ वर्षांखालील मुले:-

इप्पी: आर्यन दुरगुडे, जिल्ह्यात पहिला

सेबर: अमीन पठाण, जिल्ह्यात दुसरा

सार्थक करंडे, जिल्ह्यात तिसरा

१७ वर्षांखालील मुली:-

इप्पी: स्नेहल गाडे, जिल्ह्यात चौथी

सेबर: मृणाल जाधव, जिल्ह्यात दुसरी.

१९ वर्षांखालील मुले:-

फॉईल: प्रणव होनप, जिल्ह्यात पहिला 

इप्पी: सुयश चव्हाण, जिल्ह्यात चौथा

सेबर: शुभम वलटे, जिल्ह्यात पहिला

समर्थ करे, जिल्ह्यात दुसरा.

या सर्व खेळाडूंची पुणे विभागीय शालेय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या सर्व यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षक नागनाथ बोळगे सर, सुरज वायकुळे सर, अभिषेक कुतवळ सर, संतोष झिंजाडे सर, अलोक मिश्रा सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व विजय खेळाडूंचे पालक, प्रशिक्षक व क्रीडाप्रेमींनी अभिनंदन केले असून, पुणे विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

वीर शिवाजी महाराज तलवारबाजी ग्रुप, करमाळा च्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 6 7 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे