Breaking
ब्रेकिंग

कृषिभूषण मा. आमदार साहेबराव पाटलांनी केला “सिंदूर” चा यशस्वी प्रयोग

0 3 9 1 1 5

कृषिभूषण मा. आमदार साहेबराव पाटलांनी केला
“सिंदूर” चा यशस्वी प्रयोग

वि.उपसंपादक :- पंकज पाटील

जळगाव :- पारोळा तालुक्यातील राजवड (आदर्शगांव) येथील “राज” फार्मवर 15 ऑगस्ट, 2023 रोजी 35 “सिंदूर” रोपांची यशस्वी लागवड केली आहे. साधारणपणे “सिंदूर” चे उत्पादन हाती येण्यासाठी लागवडीच्या दिवसापासून 3 वर्षाचा कालावधी जावा लागतो. कृषीक्षेत्रात योजनाबद्ध शेती कामात बहुमोल कार्य केल्यामुळे लागवड केल्यापासून अवघ्या 15 महिन्यातच प्रती वृक्ष 1 किलोप्रमाणे 35 किलो “सिंदूर” चे प्रथम उत्पादन घेण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. “सिंदूर” झाडावर लालसर रंगाची फळे (गुच्छ) येतात. फळे कोरडी झाल्यावर या रंगाच्या असतात. या बियांमध्ये नैसर्गिक रंगद्रव्य असते, जे सुरक्षित असते. बियांना सावलीत सुकवून तद्नंतर बारीक दळून लालसर पावडर तयार केले जाते. हेच पावडर नैसर्गिक कुंकू म्हणून वापरले जाते. विश्वजगत बिया काढल्या जातात. या बिया”सिंदूर चा उपयोग”हिंदू संस्कृतीत महिलांसाठी मांग भरणीसाठी (सौभाग्य लेणं) सिंदूर वापरले जाते. नैसर्गिक खाद्य रंग म्हणून पदार्थ रंगविण्यासाठीही सिंदूर चा वापर केला जातो. त्वचेसाठी उपयुक्त असल्यामुळे औषधी आणि सौंदर्य प्रसादनातही वापर होतो. धार्मिक विधीसाठीही उपयुक्त असून हे कुंकू बाजारातील रासायनिक कुंकूपेक्षा अधिक सुरक्षित आणि शुद्ध असते. कृषीभूषण मा. आमदार साहेबराव पाटील.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे