दहिगाव सेवा सोसायटीच्या संचालक पदी कमल सर्जेराव म्हस्के यांची बिनविरोध निवड
दहिगाव सेवा सोसायटीच्या संचालक पदी कमल सर्जेराव म्हस्के यांची बिनविरोध निवड
अहिल्यानगर / प्रतिनिधी : शिवा म्हस्के
दहिगाव (ता.नगर) येथील सेवा सोसायटीचे चेअरमन सर्जेराव म्हस्के यांचे हृदयविकार ने अकाली निधन झाल्यानंतर सदर जागा हि रिक्त झाली होती. सहकारी कायद्यानुसार सदर जागा भरण बंधनकारक आहे. ती भरण्यासाठी निबंधक कार्यालय कडे तसा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मधील काळात सदर चेअरमन पदांचा पदभार अधिकार व्हाईस चेअरमन दत्तात्रय बनकर यांच्या कडे सर्वानुमते स़ोपवण्यात आला होता. महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० व महाराष्ट्र सहकारी संस्था
(समिती निवडणुक)नियम २०१४ मधील तरतुदीनुसार वरिष्ठ कार्यालयाकडून रिक्त जागा भरण्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्या प्रमाणाणे निवडणूक निर्णय अधिकारी महेश पालवे यांची प्राधिकृत अध्यासी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. दहिगाव विकास सेवा सोसायटी सहकारी संस्था मर्यादित दहिगाव अहिल्यानगर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली दिवंगत चेअरमन सर्जेराव म्हस्के यांच्या पत्नी कमल सर्जेराव म्हस्के यांची संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी यांनी जाहीर केले. या निवडणुकीत जनसेवा मंडळाचे सर्व संचालक उपस्थित मुळें हि निवड बिनविरोध पार पडली. तिनं संचालक सदर सभेस अनुपस्थित होते.या वेळी विद्यामन संचालिका गिरजा अनशाबापु म्हस्के यांनी कमल सर्जेराव म्हस्के यांचें श्रीफळ देऊन स्वागत केले.
या वेळीं निवडणूक अधिकारी महेश पालवे,अँड प़ोपट म्हस्के, बाबासाहेब बनकर,माजी सरपंच जयवंत शिंदे,व्हाईस चेअरमन दत्तात्रय बनकर, चेअरमन भानुदास ढेरे, माजी सैनिक दत्तात्रय शिंदे, माजी सरपंच सुनिल म्हस्के,विजय आन्हाड, अर्जुन चितळकर ,लक्ष्मण कालेॅ, राजेंद्र हंबर्डे,
किसन दरेकर, तात्याभाऊ म्हस्के, सेवा सोसायटी सेक्रेटरी शाहू घोडके,भिमराज वाघ, कमल म्हस्के, गिरजा म्हस्के आदी उपस्थित होते


