सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील हरित सेना व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण
सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील हरित सेना व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण
राहुरी तालुका जावेद शेख
सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाती हरित सेना आणि वन विभाग,महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने धरमाडी टेकडी येथे वृक्षारोपण संपन्न झाले
.
यामध्ये राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी अगोदर दोन दिवस वृक्ष लागवडीची पूर्वतयारी म्हणून 185 खड्डे खोदण्यात आली. वृक्ष लागवडीमध्ये चिंच, पिंपळ ,बदाम ,आवळा इ. देशी प्रकारच्या 185 वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी वनशेती विभागाचे विभाग प्रमूख डाॅ.रविंद्र कोळसे, विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण तुपविहीरे , उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे, पर्यवेक्षक मनोज बावा,प्राध्यापक जितेंद्र मेटकर, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब खेत्री ,तुकाराम जाधव ,मोनाली म्हसे,पूनम गायकवाड, जयेश हरणस्कर,मनोज साळवे,कराळे मॅडम आदी उपस्थित होते.



