पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीने संपन्न व्हावा यासाठी सेवा पंधरवडा कार्यक्रम आयोजित.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीने संपन्न व्हावा यासाठी सेवा पंधरवडा कार्यक्रम आयोजित.
वाळकी / प्रतिनिधी :- दादा आगळे
विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून अहील्यानगर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सेवा पंधरवड्याचा शुभारंभ गुरुवारी राहाता येथे होणार असून शासनाच्या विविध विभागांच्या योजनांचे वितरण लाभार्थीना करण्यात येणार आहे.
शहरातील कुंदन लाॅन्स मध्ये सकाळी १०वाजता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास सभापती राम शिंदे जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह सर्व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहाणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीने संपन्न व्हावा यासाठी सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे.यामध्ये महसूल विभागाच्या वतीने पानंद रस्ते जिवंत सातबारा योजनेतील लाभार्थीना तसेच शासनाच्या विविध योजनाच्या लाभार्थीना मंजूर योजनेचे पत्र तसेच दाखले वितरीत करण्यात येणार आहेत.कृषि विभागाच्या वतीने शेतकर्यांना मंजूर झालेल्या योजनेतील औजारे वितरीत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.



