दादासाहेब दरेकर यांच्या पाठपुराव्यामुळे कुताळमळ्यात सिंगल फेज रोहित्र तत्काळ बसवले….
दादासाहेब दरेकर यांच्या पाठपुराव्यामुळे कुताळमळ्यात सिंगल फेज रोहित्र तत्काळ बसवले….
गुंडेगाव प्रतिनिधी: संजय भापकर
गुंडेगाव कुताळमळा येथील सिंगल फेज रोहित्र खराब झाल्यामुळे मागील चार ते पाच दिवसांपासून परिसरातील काही भाग अंधारात होता. वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना दुध व्यवसाय व इतर दैनंदिन कामकाजात अडचणींचा सामना करावा लागत होता.
ही समस्या युवा नेते दादासाहेब दरेकर यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू केला. त्यांनी वारंवार संपर्क साधत रोहित्र बदलण्याबाबत आग्रह धरला. त्यांच्या प्रभावी पाठपुराव्याची दखल घेत विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित आदेश देत विद्युत कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवले. त्यानंतर खराब झालेले सिंगल फेज रोहित्र काढून नव्याने रोहित्र बसवण्यात आले. त्यामुळे कुताळमळा परिसरातील वीजपुरवठा पुन्हा सुरळीत झाला. वीज आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
वेळीच हस्तक्षेप करून सार्वजनिक प्रश्न मार्गी लावल्याबद्दल कुताळमळा ग्रामस्थांनी दादासाहेब दरेकर यांचे मनःपूर्वक आभार मानले असून, त्यांच्या कार्याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.


