Breaking
ब्रेकिंग

भगवान श्री जाहरवीर गोगादेव जन्मोत्सव मिरवणुकीसाठी भिंगार व नगर शहरात पोलिस बंदोबस्त आणि CCTV यंत्रणा राबवा

जिल्हा पोलीस अधीक्षकांना मागणी- सनीभैय्या खरारे..

0 7 6 9 4 3

भगवान श्री जाहरवीर गोगादेव जन्मोत्सव मिरवणुकीसाठी भिंगार व नगर शहरात पोलिस बंदोबस्त आणि CCTV यंत्रणा राबवा

जिल्हा पोलीस अधीक्षकांना मागणी- सनीभैय्या खरारे..

नगर / प्रतिनिधी : संवेद वायकर

अखिल भारतीय वाल्मीकी समाज संघटना व समस्त वाल्मिकी समाजाच्या वतीने, दरवर्षी प्रमाणे यंदाही भगवान श्री.जाहरवीर गोगादेव महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे.सालाबाद प्रमाणे हा उत्सव दोन दिवसांचे असून, १६ ऑगस्ट रोजी (शनिवार) भिंगार शहरात व १७ ऑगस्ट रोजी (रविवार) नगर शहरात शोभायात्रा व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या पवित्र बागड सणाचे आयोजन मेहतर वाल्मिकी समाजाच्या वतीने अत्यंत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात केले जाते.या शोभायात्रेत केवळ अहिल्या नगर जिल्ह्यातीलच नव्हे,तर राज्याच्या विविध भागांतून भक्त मोठ्या संख्येने सहभागी होतात.यंदा सुद्धा हजारो भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे.सध्या देशभरात महापुरुषांच्या जयंती मिरवणुकीत किंवा धार्मिक सणांदरम्यान काही ठिकाणी अनुचित प्रकार,तणाव आणि दंगली घडल्याच्या पार्श्वभूमीवर, या मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,तसेच शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी,यासाठी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे अशी मागणी अखिल भारतीय वाल्मीकी समाज संघटनेच्या वतीने पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी अखिल भारतीय वाल्मिकी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनीभैय्या खरारे,जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन,जिल्हा सचिव संतोष सारसर,जिल्हा उपसचिव शुभम टाक,सामाजिक कार्यकर्ते अर्जुन चव्हाण,पैहलवाण अनिल वाणे, सामाजिक कार्यकर्ते अजय सौदे, आकाश कुडीया,नरेश चव्हाण, संदिप करोलिया,तुषार करोलिना,राहुल कनोजिया,कीरण लाड,विक्की करोलिया,धीरज बैद,रोहन चावरे,धिरज सारसर,संदिप बसोर,अजय नरवाला,अक्षय चव्हाण,आदी उपस्थित होते .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे