Breaking
ब्रेकिंग

गुंडेगाव येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात; उत्कृष्ट कार्यासाठी दोन महिला शिक्षिकांचा सन्मान…

0 8 6 5 1 0

गुंडेगाव येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात; उत्कृष्ट कार्यासाठी दोन महिला शिक्षिकांचा सन्मान…

प्रतिनिधी : संजय भापकर

गुंडेगाव /अहिल्यानगर : थोर समाजसुधारिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती गुंडेगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या प्रसंगी पाऊतका वस्ती व कुताळमळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला शिक्षिका मनिषा भालसिंग मॅडम व दिपस्वी पवार मॅडम यांचा ग्रामस्थांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बबनराव हराळ पाटील होते. यावेळी माजी उपसरपंच संतोष भापकर, ग्रामपंचायत सदस्य सतीश चौधरी, भाऊसाहेब जाधव,रोहीदास कुताळ, राजेंद्र कुताळ, खंडु भिसे, बाळासाहेब चौधरी, तसेच अमोल भापकर, दत्ता भापकर, भिवसेन भापकर, राहुल दिवटे व पत्रकार संजय भापकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या मनिषा भालसिंग मॅडम यांनी आदिवासी मुला-मुलींना मुख्य शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले आहेत. विशेषतः गुंडेगाव येथील पारधी समाजातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी त्यांनी वैयक्तिक लक्ष देत, पालकांशी संवाद साधून शाळेत नियमित उपस्थिती वाढवण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या या कार्याची दखल घेत सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त त्यांचा गौरव करण्यात आला.तसेच दिपस्वी पवार मॅडम यांनी शाळेत विविध क्रियाशील व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत अनेक विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. अनेक मुलींना स्पर्धात्मक परीक्षांसाठी मार्गदर्शन करून लहान वयातच त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणविषयक विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या या दोन्ही शिक्षिकांच्या कार्याचे कौतुक केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 1 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे