राहुरी कृषी विद्यापीठात इस्त्री चे कपडे घालून फिरणाऱ्या मिस्तरी चा अधिकाऱ्यांवर वचक ; आमदाराच्या नावा खाली/एक एसी नंबर
राहुरी कृषी विद्यापीठात इस्त्री चे कपडे घालून फिरणाऱ्या मिस्तरी चा अधिकाऱ्यांवर वचक ; आमदाराच्या नावा खाली/एक एसी नंबर
राहुरी/प्रतिनिधी : अशोक मंडलिक
राहुरी कृषी विद्यापीठात कामाचा कायमच गडबड घोटाळा होत आहे त्यातच एक इस्त्रीचे कपडे घालून मिस्त्री पणाचा आव आणणारा स्वयंघोषीत मिस्तरी विद्यापीठातील आधिकांऱ्यावर राजकीय दबाव टाकुन स्वःताच्या इच्छे प्रमाणे त्याला पाहिजे त्याच कामाची मागणी करत असतो त्याच्या मनाप्रमाणे काम न मिळाल्यास हा मिस्तरी नामक इसम राजकीय पुढाऱ्यांचे उंबरे झिजवताना दिसतो वास्तविक मिस्तरीचे पद हे स्थापत्य पर्यवेक्षक ( सिव्हील सुपरवायझर )ह्या शैक्षणीक अर्हतेचे आहे तर ह्या मिस्तरीची शैक्षणिक अर्हता यांत्रीकी तथा विजतंत्री (आटो इलेट्रेशीयन )धारण केलेली आहे या मिस्तरी काम करणाऱ्या कर्मच्या ऱ्याची नियुक्ती पुर्वी प्रक्षेत्र कार्यशाळेवर होती परंतु ह्या कर्मच्याऱ्याने काहीतरी घोटाळा केला म्हणुन याची कोल्हापूर येथे बदली करण्यात आली होती मात्र परंतु राजकीय पुढाऱ्यांशी संबंध असलेल्या काही अधिकाऱ्यांनी याला मदत करून कोल्हापूर येथुन सेवासंचित (पुल ) करून मध्यवर्ती परीसर येथे बदलुन आणले बदली झाले नंतर ह्या स्वयंघोषीत मिस्तरीची नेमनुक त्याच्या धारण केलेल्या शैक्षणीक अर्हते नुसार कृषी निगडीत यंत्रे (फार्म इम्प्लीमेंट मशिनरी ) विभाग किंवा कार्यशाळा तंत्रज्ञान प्रयोगशाळा ( वर्कशॉप टेक्नॉलॉजी लॅबरोटरी ) कृषी अभियांत्रीकी महाविद्यालय म फु कृ वि राहुरी किंवा विद्यापीठाच्या ताब्यातील यांत्रीकी कार्यशाळा येथे होणे अवश्यक होते सध्या परंतु मिस्तरी नामक इसमाने राजकिय दबाव तंत्राचा वापर करून स्वःताला विद्यापीठाच्या बांधकाम विभागाकडे घेण्यास भाग पाडले सदर कर्मच्याऱ्याच्या राजकीय दबाबा पोटी
ना इलाजास्तव सदर कर्मच्याऱ्याला विद्यापीठातील मुळा,प्रवरा,गोदावरी , शेतकरी निवास, हि सर्वच अतिथीगृहे सांभाळण्याची जबाबदारी द्यावी लागली परंतू सदर कर्मचारी राजकीय पाठबळावर विद्यापीठाच्या मध्यवर्ती परीसरात इस्तरी चे कपडे घालून फिरतो परंतु दमदाटीने मिळविलेल्या मिस्तरी पदाचे कर्तव्य पार पाडत नसल्याने घ्या अतिथीगृहांचे तिन तेरा वाजले आहेत हा वशिलेबाज मिस्तरी प्रवरा अतिथीगृहाचा वापर स्वःता साठी व मित्रांसाठी वापरतो नांव उघड न करणाच्या बोलीवर त्या ठिकाणी काही कंत्राटी मजुरांनी सांगीतले की बऱ्याच वेळा हा मिस्तरी आलेल्या अथीतींकडून शुल्क घेतो परंतु त्यांच्या पावत्या देखील देत नाही साफसफाई करणाऱ्या मजुरांना अर्वाच्य भाषेत बोलतो महीला मजुरांना देखील बोलत असतो जर कोणास सांगितले तर कामावरून काढण्याच्या धमक्या देतो विधापीठाची मालमत्ता स्वतःची असल्या सारखी वापरतो ह्या स्वयंघोषीत मिस्तरी विरुद्ध वरिष्ठांकडे तक्रारी झाल्याचे समजते ह्या मिस्तरीच्या मनमानी कारभाराकडे वरिष्ठांचे लक्ष का नाही किंवा त्याला त्याच्या मुळ पदावर का पाठवत नाही विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी कोणाच्या दबाबाला बळी पडत आहेत काय किंवा हे अधिकारी व हा मिस्तरी नामक कर्मच्यारी यांची मिली भगत आहे काय असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत वरिष्ठांनी किंवा विद्यापीठ प्रशासनाने या स्वैर मस्तरीच्या मनमानी कारभाराला आळा घालावा व हि अतिथीगृहे प्रामाणिक कर्मच्याऱ्यांच्या हाती देऊन येणाऱ्या अतिथींना सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी शेतकरी अतिथी वर्गातुन होत आहे



