मैत्री हेच जीवन हे दाखवून देणारे 1974 चे वर्गमित्र प्रत्येक वर्षी करतात स्नेहमेळावा


मैत्री हेच जीवन हे दाखवून देणारे 1974 चे वर्गमित्र प्रत्येक वर्षी करतात स्नेहमेळावा
करमाळा / विशेष प्रतिनिधी : सचिन जव्हेरी
करमाळा शहरातील सर्वात जुने असलेले महात्मा गांधी विद्यालय या शाळेतील 1974 साली इयत्ता अकरावी पर्यन्त एकत्र शिक्षण घेतलेले विद्यार्थी-विद्यार्थीनी आजही एकविचाराने-एकदिलाने वर्षातून एकदा एकत्रीत येवून जिवनाचा आनंद घेत एकमेकांसोबत – एकमेकांना विचाराचे आदान-प्रदान करून एकत्रित येत स्नेहमेळावा गेटटुगेदर करतात. हाच खरा आदर्श असुन सर्वांनी यातुन प्रेरणा घेण्यासारखे आहे.
करमाळा शहरात 1974 सालापर्यंत महात्मा गांधी विद्यालय या विद्यालयात एकत्रित शिक्षण घेतलेले,त्या वयातील प्रत्येकाचा स्वभाव,अनुभव,गुणदोष, कला, केलेल्या खोड्या,शिक्षणातील प्रगती,विविध शिक्षकांच्या वेगवेगळ्या आठवणी,शिक्षकांनी दाखवून दिलेले उदाहरणे,समजावून सांगितलेला जिवनसार या व यासारख्या हजारो आठवणींना उजाळा देत,हस्याचे एकत्रीत फवारे उडवत ही संपुर्ण वर्गमित्रांची टिम प्रत्येक वर्षी आपापल्या कुटुंबासह एकत्रित येऊन खुप मजा व आनंद लुटतात या मिळालेल्या आनंद-समाधानाच्या उर्जेच्या याच शिदोरीवर पुन्हा पुढील वर्षाची वाट पहात असतात.
आज तत्कालीन विद्यार्थी-विद्यार्थीनी हे वयोमाना नुसार जेष्ठ नागरिकच्या उंबरठ्यावर आले आहेत तर काही या उंबरठ्या जवळ येत आहेत. असे असले तरी ते ज्या ज्या वेळेस एकत्रीत येतात त्या त्या वेळेस ते अगदी बालपणात रमुन जातात. आणि हाच खरा जिवनाचा आनंद व सार असून यातुन प्रत्येकाने आपल्या जीवनाचा आनंद कशात शोधावा तर मैत्रीत शोधावा हेच अखेर सत्य आहे. ही प्रेरणा घेवून प्रत्येकाने असेच गेटटुगेदर केले तर जिवनात नैराश्याला जागाच उरणार नाही असा हा आदर्श या मित्रमंडळाच्या गेटटुगेदर ने दाखवलेला आहे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
आज या सन 1974 च्या वर्गमित्रांमधुन कोण तहसिलदार,तलाठी,वकिल, व्यापारी,राजकारणी,उद्योगपती,यासारख्या विविध क्षेत्रात निर्व्यसनी यशस्वी वाटचाल करत आहेत. आणि विशेष म्हणजे एखाद्याच्या पती- पत्नी यातुन कोणी मयत झाले असतील तरी जे आहेत ते या गेटटुगेदरला जाॅईन्ट करतातच हेच यांच्या मैत्रीचे वैशिष्ट्य आहे.
नुकतीच या वर्गमित्रांनी कोकण येथे ३ दिवसीय गेटटुगेदर केले असून हे सर्व घडवून आणण्यासाठी झरे तालुका करमाळा येथील बाळासाहेब विलासराव पाटील तसेच ॲड. भुषण देवी,मिलिंद गांधी,अरूण पाटील हे विशेष परिश्रम घेत असतात .
हे आहेत ते 1974 चे विद्यार्थी-विद्यार्थीनी :
छन्नुलाल देवी,बाळासाहेब पाटील,मिलिंद गांधी, भूषण देवी , प्रदीप देवी,रशीद बागवान, रमेश कटारिया, नंदकुमार दोषी, मुकुंद राजोपाध्ये,विश्वनाथ यादव, सुरेखा कुलकर्णी नाडगौरा, सविता सुराणा, अनिता जैन पहाडे,प्रतिभा मोरे, पप्पु सिंधी, कालिदास गायकवाड, वीणा देवी, अरुण पाटील,मंगल केकान, विजया सुरू .
. . . . . . . . . . .
यावेळी मोठ्या कौतुकाने बोलताना करमाळा येथील सुप्रसिद्ध कापड व्यापारी पप्पुशेठ सिंधी म्हणाले की,आम्ही सर्व एकत्रित येतो तेंव्हा आम्ही आमच्या इतर सर्व कामांकडे दुर्लक्ष करून एकत्रित येण्याला प्राधान्य देतो. यातुन आम्हाला नवचैतन्य व उर्जा प्राप्त होवून मनाला खुप शांती व समाधान मिळते,आणि हे कुठेही विकत मिळत नाही तर केवळ आपल्या मित्रपरिवाराकडुनच मिळते. मात्र आज अनेकजण एकटे-एकटे राहणे पसंत करताना दिसतात ते योग्य नाही,त्यांनीही आपला असाच मित्रपरिवार एकत्रित करून जिवनाचा आनंद घ्यावा,आणि मैत्री हेच जीवन या सुत्राचा अवलंब करावा .


