Breaking
ब्रेकिंग

पोलीस स्टेशनच्या ‘नेत्रम’ चे खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते उदघाटन*

पोलीस स्टेशनमधून नियंत्रित होणार शहरातील  ११० कॅमेरे*

0 4 3 3 2 9

*पोलीस स्टेशनच्या ‘नेत्रम’ चे खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते उदघाटन*

*पोलीस स्टेशनमधून नियंत्रित होणार शहरातील  ११० कॅमेरे*

वि.उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर :- अमळनेर शहरातील गुन्हेगारी नियंत्रण    आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी अमलात आणलेले नेत्रम खूप उपयोगी पडणार आहेत. नागरिकानी देखील पोलिसांच्या कारवाईत अडथळा आणू नये. आपल्या चुकलेल्या तरुण पाल्याना बचावाच्या कुबड्या आपण देऊ नये असे आवाहन खासदार स्मिता वाघ यांनी अमळनेर शहरातील सिसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या एकत्रित नियंत्रण कक्षाच्या शुभारंभ प्रसंगी केले.
     यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी , माजी जिप सदस्य जयश्री पाटील , डीवायएसपी विनायक कोते , डीवायएसपी केदार बारबोले उपस्थित होते.    पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या संकल्पनेतून नेत्रम ही संकल्पना राबवण्यात आली. अमळनेर शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण आता पोलीस स्टेशन मधून होणार आहे. यावेळी पोलीस अधीक्षक रेड्डी म्हणाले की आमदार निधी ,लोकसहभागातून बसवलेल्या  सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व संपूर्ण यंत्रणेची  देखभाल दुरुस्ती आता पोलीस करणार आहेत.
नेत्रम यंत्रणा आणि ई बिट ऍप माध्यमातून पोलीस प्रशासन गतिमान झाले आहे. प्रास्ताविक करताना डीवायएसपी विनायक कोते म्हणाले की शहरातील विविध चौक आणि रस्ते ११० कॅमेऱ्यानी जोडले गेले आहे. इतरही भागातील कॅमेरे नेत्रम यंत्रणेशी जोडून शहर व तालुका अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अमळनेर पोलीस स्टेशनचे तत्कालीन प्रभारी डीवायएसपी केदार बारबोले आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या प्रयत्नांतून ही यंत्रणा पूर्णपणे उभारली गेली आहे.
यावेळी जयश्री पाटील यांनी आमदार अनिल पाटील यांच्या विकास निधीतून यंत्रणा उभारल्याचे सांगून शहराच्या व तालुक्याच्या विकासात भर पडत असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन संजय पाटील यांनी तर आभार पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी मानले. मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण वाढले असल्याने पोलीस आणि  महिला दक्षता समितीच्या मदतीने शाळा व महाविद्यालयात जनजागृती मोहीम राबवण्यात येणार असून त्याबाबत शाळांना पत्रव्यवहार झाल्याचे पोलीस निरीक्षक निकम यांनी सांगितले.
      कार्यक्रमास महिला दक्षता समितीच्या सुलोचना वाघ , माधुरी पाटील , प्रा शीला पाटील , प्रमोदिनी पाटील , अलका गोसावी ,भारती शिंदे , विक्रांत पाटील , मुख्तार खाटीक , संजय पाटील ,सुरेश पाटील , इम्रान खाटीक , सलीम टोपी , पंकज चौधरी , बाळासाहेब संदानशीव , आरिफ तेली ,फिरोज मिस्तरी हजर होते.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 3 2 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे