Breaking
ब्रेकिंग

जगात कापसाचे भाव कमी असल्याने अमेरिकेच्या कापसाला मागणी; आयात ६ पटीने वाढली

0 4 3 3 2 7

जगात कापसाचे भाव कमी असल्याने अमेरिकेच्या कापसाला मागणी; आयात ६ पटीने वाढली

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

 भारतामध्ये कापसाचे दर दबावात असतानाच आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन कापूस आणखी स्वस्त झाला आहे. परिणामी फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान अमेरिकेहून कापसाची आयात तब्बल ६ पटीने वाढली आहे.
देशात यंदा कापसाचे दर दबावात आहेत. मात्र अमेरिकेत व्यापार युध्दामुळे भाव पडलेले आहेत. भाव कमी असल्याने भारतात अमेरिकेच्या कापसाची आयात तब्ब ६ पटीने वाढली. मागील तीन महिन्यात अमेरिकेतून १ लाख ५५ हजार गाठींची आयात झाली. अमेरिकेत आजही भाव कमीच आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या कापसाची आयात सुरुच राहील, असे आयातदारांनी सांगितले.

`स्मार्ट कॉटन’ प्रकल्प गुंडाळण्याच्या हालचाली

भारतात यंदा शेतकऱ्यांना कापसाला भाव कमी मिळत आहे. कापसाचे भाव मागील चार वर्षात कमीच झाले आहेत. देशातील बाजारात सध्या कापसाला सरसारी मुख्य कापूस ७ हजार ३०० तर लांब धाग्यांचा कापूस ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. पण बाजारातील शेतकऱ्यांच्या कापसाची आवक खूपच कमी झाली. त्यामुळे कापसाच्या भावात सुधारणा दिसून येत आहे. यंदा बहुतांशी शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दरात कापूस विकावा लागला. तरीही आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव आपल्यापेक्षा कमीच आहेत.

Also read:
Cotton import duty : कापूस आयात शुल्काबाबत शेतकरी हिताचा निर्णय घेणार ; असे केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्र्यांचे आश्‍वासन अजून पुर्ण होत नाही आहे .
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार युध्द सुरु केले. त्यामुळे अमेरिकेत कापसाचे भाव आणखी कमी झाले. अमेरिकेचा कापूस स्वस्त असल्याने भारतासह आशियातील देशांनी अमेरिकेच्या कापसाची आयात वाढवली. भारतातही मागील ३ महिन्यांमध्ये अमेरिकेतून आयात होणाऱ्या कापसाचे प्रमाण वाढले आहे. फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान अमेरिकेच्या कापसाची आय़ात ६ पटीने वाढली. या तीन महिन्यात भारताने १ लाख ५५ हजार गाठी (एक गाठ १६० किलो) कापसाची आयात केली. गेल्या वर्षी याच तीन महिन्यांमध्ये अमेरिकेतून भारतात केवळ २५ हजार गाठींच्या दरम्यान कापसाची आयात झाली होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 3 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे