सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर लैंगिक अत्याचार..
सोशल मीडियावर फोटो वायरल करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला अटक
सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर लैंगिक अत्याचार..
सोशल मीडियावर फोटो वायरल करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला अटक
माहूर/ प्रतिनिधी
सारखणी येथील एका तरुणाने तरुणाची मैत्री जमवली. त्यानंतर तिच्याकडे वारंवार शरीर सुखाची मागणी केल्याने तिने नाकार देत त्यांच्याकडे असलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.
या प्रकरणात सिंदखेड पोलीस ठाण्यामध्ये दि. 27 जुलै रोजी पीडित यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरफराज खान नौशाद खान (वय 27, व्यवसाय-मजुरी, रा . सारखणी) याने मैत्रीच्या नात्यातून ओळख वाढवून तिचे काही फोटो काढले.
याबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. या तक्रारीनुसार आरोपीवर गु. र. न.११५/२०२५ अंतर्गत भारतीय न्यायसहिता २०२३ मधील कलम ६४(१),७५(२)(३),७८,७९,३५१(२)(३) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास माहूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणेश कराड करीत असून, शंकरचे पोलीस निरीक्षक रमेश जाधव यांचीही तपासात सहभाग आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीस न्यायालयात हजर केले आता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.



