लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात

लोहार युथ फाऊंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात
राहुरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर
उक्कडगांव प्रतिनिधी : बाबु तिपुळे
लोहार युथ फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा राहुरी येथे नुकताच मोठ्या उत्साहात व दिमाखदार वातावरणात पार पडला. या सोहळ्यास अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यभरातील फाऊंडेशनचे पदाधिकारी, समाजबांधव, विद्यार्थी, पालक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच मान्यवरांच्या हस्ते भगवान विश्वकर्मा महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुरी येथील मा. नगराध्यक्ष दशरथ पोपळघट हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे, नगरसेवक केतन पोपळघट, नायब तहसीलदार राजेंद्र लाड,कार्यकारी अभियंता दीपक आगळे,शांताराम लोखंडे, प्रभाकर लाड, फाऊंडेशनचे राज्य अध्यक्ष किशोर सोनवणे,अजय खंडागळे, नितेश लोखंडे, रवींद्र थोरात,राजेंद्र आगळे, बाळासाहेब लोखंडे, बाबा हरेल, उत्तमराव लोखंडडचूर, विशाल जवने आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते उद्योगश्री माय-माऊली, शिक्षणश्री,विशेष सेवा पुरस्कार तसेच कला क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व मान्यवरांचा गौरव करण्यात आला.तसेच डॉ. प्रमोद थोरात,अभियंता अभिजीत म्हस्के आणि पोलीस कॉन्स्टेबल किशोर लाड यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविक भाषणात फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर सोनवणे यांनी संघटनेचे ध्येय-धोरण आणि गेल्या बारा वर्षांतील फाऊंडेशनच्या वाटचालीचा आढावा सांगितला.यावेळी नायब तहसीलदार राजेंद्र लाड यांनी विद्यार्थ्यांनी अधिकाधिक चांगले गुण मिळवून एम.पी.एस.सी, तसेच यू.पी.एस.सी व राज्यसेवा परीक्षांच्या माध्यमातून मोठ्या पदांवर जाऊन समाजासाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले. दीपक आगळे यांनी समाजातील नव युवकांनी पारंपरिक व्यवसायाला आधुनिक डिजिटल मशीनरीची जोड देऊन उद्योग-व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत असे विविध मान्यवरांची आपल्या मार्गदर्शन भाषणातून सांगितले.
तसेच लोहार युथ फाऊंडेशनच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून नियुक्तीपत्रे देण्यात आली. त्यामध्ये राहुरी शिक्षण प्रमुखपदी विलास थोरात,अहिल्या नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष दादासाहेब आगळे,नगर उत्तर जिल्हाप्रमुख अतिश हरेल,जिल्हा प्रसिद्धी प्रमुखआदिनाथ कौसे,राहुरी संघटकपदी रोहन गाडेकर,तर राहुरी तालुकाप्रमुख म्हणून अमोल रणसिंग यांची नियुक्ती करण्यात आली.तसेच महिलांमध्ये नगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी वैशाली थोरात, दक्षिण विभाग महिला जिल्हाध्यक्ष आरतीताई थोरात यांच्या नवनियुक्ती जाहीर करण्यात आल्या आहेत.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय इघे व विलास थोरात यांनी केले तर आभार अतिश हरेल सर यांनी मानले.कार्यक्रमासाठी राज्य कार्यकारिणीचे सदस्य सागर आगळे, दत्तात्रय पोपळघट, सुनीता गाडेकर, विजय हरिहर, अमोल जवणे, अतिश हरेल, आदिनाथ कौसे, संदीप पखाले, नवनाथ दवणे, जयराम आगळे, सागर ईघे, अरुण ईघे, किरण ईघे, प्रेम नन्नावरे, किशोर नन्नावरे यांच्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.तसेच कार्यक्रमासाठी अन्नदानाची व्यवस्था दशरथ पोपळघट व दिलीप रामभाऊ पवार यांनी केली तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ज्ञानेश्वर पोपळघट, सावळी विहीर यांनी केली.


