नियम मोडणाऱ्या वाहनांवर राहुरी पोलीस स्टेशनची दंडात्मक कारवाई

नियम मोडणाऱ्या वाहनांवर राहुरी पोलीस स्टेशनची दंडात्मक कारवाई
राहुरी तालुका जावेद शेख
राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत सन 2024 मध्ये 57 सन 2025 मध्ये 58 प्राणातिक अपघात होऊन दोन वर्षात सुमारे ११५ निष्पाप नागरिक मृत्युमुखी झाले होते . यातील बहुतांश मृत्युमुखी पडलेले नागरिक हे दुचाकी चालवताना हेल्मेट न वापरणारे होते.सदर प्राणतीक अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी विना हेल्मेट दुचाकीवर प्रवास करणारे प्रवाशावर दिनांक 10/02/2026 पासून राहुरी पोलीस स्टेशन चे वाहतूक विभागामार्फत कारवाई सुरू करण्यात आली आहे. आज दिनांक 11/02/2026 रोजी कारवाईचे दुसरे दिवशी विदाउट हेलमेट 100 दुचाकी स्वारांवार कारवाई करत 100000(*एक लाख*) व रॉंग साईट जाणाऱ्या पाच वाहनावर 9000(*नऊ हजार*) रुपये दंड आकारण्यात आला. सदर कारवाई यापुढेही नियमित केली जाणार आहे.
तरी सर्व दुचाकी स्वार यांना आव्हान करण्यात येते की आपण नगर मनमाड हाई वे वर हेलमेट चा वापर करून आपली स्वतः ची काळजी घ्यावी.
सदरची कारवाई मा.सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री सोमनाथ वाकचौरे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर श्री जयदत्त भवर उपविभागीय पोलीसअधिकारी अधिकारी श्रीरामपूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन व वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार भाऊसाहेब आव्हाड पोलीस हवालदार संतोष ठोंबरे , रमेश दरेकर, बापू फुलमाळी केली आहे.



