Breaking
ब्रेकिंग

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त राजश्री शाहू महाराज प्रतिष्ठान चालक मालक च्या वतीने शिव अन्नदान करुन शिवजयंती उत्साहात साजरी

0 7 6 9 4 1

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त राजश्री शाहू महाराज प्रतिष्ठान चालक मालक च्या वतीने शिव अन्नदान करुन शिवजयंती उत्साहात साजरी

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. १९/ करमाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त राजश्री शाहू महाराज प्रतिष्ठान चालक मालक संघटना यांच्या वतीने विविध कार्यक्रम सादर करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सजावट करण्यात आली. रांगोळी काढून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. सर्व जाती धर्माच्या उपस्थित मान्यवर, राजकीय, अराजकीय, सर्व समावेशक मानून शिव व्याख्याते भीमराव लोंढे यांच्या छत्रपती शिवाजी महाराज शिव धर्मा नुसार शिवाजी वंदना व जिजाऊंची वंदना घेण्यात आली.

यावेळी 500 लोकांना पोट भर शिव अन्नदान करून शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. असेच सर्व महापुरुष यांच्या विचारांचा वसा पुढे कायम चालू ठेवत कोणत्याही प्रकारची कोणालाही काहीही गरज पडल्यास 1 हात मदतीचा देत प्रतिष्ठान पदाधिकारी सामाजिक बांधिलकी जपणार. देव देवता यांना फाटा देऊन महापुरुषांच्या विचाराने स्वराज्य निर्माते देशाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्यांनी तोरण बांधुन स्वराज्याच्या हितासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निष्ठा ठेऊन राज्य घडवणार्‍या मावळ्यांच्या इतिहास आहे. शिवाजी महाराज हे कोण्या जातीचे नसून ते अखंड भारत व जगाचे राजे होते. असा राजा पुन्हा होणे नाही.

यावेळी सर्व अध्यक्ष, पदाधिकारी, करमाळा तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेमी, शिव प्रेमी, करमाळा पोलीस अधिकारी, राजश्री शाहू महाराज प्रतिष्ठान चालक मालक संघटना करमाळा तसेच करमाळा तालुक्यातील शेकडोंच्या उपस्थित छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे