लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेची आजची गणेशाची पूजा व आरती बँक ऑफ इंडियाच्या शाखाधिकारी सौ. शीतल मटकर यांचा हस्ते

लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेची आजची गणेशाची पूजा व आरती बँक ऑफ इंडियाच्या शाखाधिकारी सौ. शीतल मटकर यांचा हस्ते
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २३/ लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था शाखा करमाळा च्या आजची श्री गणेशाची पूजा व आरती बँक ऑफ इंडिया शाखा करमाळा चे शाखाधिकारी सौ. शीतल मटकर मॅडम यांचा हस्ते करण्यात आली.
आरती नंतर मॅडम यांना आपले लोकमंगल समूहाची सर्व माहिती सांगण्यात आली. तसेच पतसंस्थेची वैशिष्टे, ठेवी यांची सर्व माहिती सांगितली. त्यांना आपले लोकमंगल समूह इतका मोठा आहे व कार्यही मोठे आहे याचे कौतुक वाटले.
लोकमंगल पतसंथेकडून त्यांचा पुष्पगुच्छ, शाल,ज्ञअहवाल, पॉम्प्लेट देऊन शाखेतील महिला स्टाफ कडून त्यांचा सत्कार करण्यात आला.
त्यावेळी पोथरे येथील महिला व्यावसायिक अमृता पापड उद्योगाचे प्रमुख सौ. उषा आढाव, शाखाधिकारी, शाखेतील कर्मचारी व खातेदार उपस्थित होते.


