Breaking
ब्रेकिंग

पत्रकार जावेद शेख यांना गरुड फाउंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

0 3 9 0 7 2

पत्रकार जावेद शेख यांना गरुड फाउंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

प्रतिनिधी : संवेद वायकर

राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील पत्रकार जावेद शेख यांची गरुड फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

गरुड फाउंडेशनचे कार्याध्यक्ष रमेश खेमनर यांनी जावेद शेख यांना निवडीचे पत्र देऊन ही माहिती कळविली. हा पुरस्कार सोहळा शनिवार, (दि. ७) जून रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ नामवंत लेखक , तहसीलदार व पोलीस निरीक्षक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान केला जाणार आहे.

  जावेद शेख हे वरवंडी ता.राहुरी येथील रहिवासी असुन गेल्या 20 वर्षापासून दै.सार्वमत,सा.भडकत्या ज्वाला,दै.पुणे वैभव, दै.हिदुसमाट, दै.साईसंध्या,दै.श्रीगोंदा टाईम्स, दै.विश्वजीत, दै.मेहकर टाईम्स व एस डब्ल्यू न्यूज पोर्टल आदी वृत्तपत्रांत पत्रकार काम केले असून व युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राहुरी तालुका संघटक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते ग्रामीण भागातील प्रश्न निर्भिडपणे मांडत असून, सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेत आहेत. विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराबद्दल राहुरी तालुक्यातुन व परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी ग्रामस्थांनी त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

3.7/5 - (3 votes)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे