शिक्षक भारती जिल्हा कार्यकारणीत पदाधिकारी यांची निवड
शिक्षक भारती जिल्हा कार्यकारणीत पदाधिकारी यांची निवड
राहुरी वृत्तसेवा : जावेद शेख
शिक्षणाची हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी लढणारी संघटना म्हणजे शिक्षक भारती शिक्षक भारती संघटनेच्या अहिल्यानगर जिल्हा कार्यकारणीवर सर्वांनुमते पदाधिकारी यांची निवड करण्यात आली. दिवसेंदिवस शिक्षकांच्या प्रश्नांमध्ये वाढ होत चालली आहे शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटना बळकट करणे गरजेचे आहे शिक्षक भारती संघटनेच्या राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, आमदार कपिल पाटील,कार्याध्यक्ष सुभाष मोरे, विनाअनुदान धोरण समितीचे राज्याध्यक्ष जयवंत भाबड,महिला अध्यक्ष रूपालीताई कुरुमकर, पुणे विभागीय कार्याध्यक्ष महेश पाडेकर, जिल्हाध्यक्ष रामराव काळे यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा कार्यकारणीवर नियुक्ती सर्वांनुमते देण्यात आली आहे. श्री. साईनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिर्डी येथील प्रा. संजय भाऊराव तमनर यांची अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच चंद्रगीर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मांजरी तालुका राहुरी येथील श्री. तांबे बाळासाहेब मकाजी यांची जिल्हा मार्गदर्शक पदी निवड करण्यात आली, पोहेगाव कनिष्ठ महाविद्यालय येथील प्रा. नरेंद्र लहिरे यांची कोपरगाव तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली, प्रेमराज सारडा महाविद्यालय येथील प्रा. साईनाथ थोरात यांची अहिल्यानगर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली पाथर्डी तालुका उपाध्यक्षपदी संतोष आठरे यांची निवड करण्यात आली सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी शिक्षक भारती संघटनेचा प्रचार, प्रसार करण्याची ग्वाही सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांनी दिली यावेळीजिल्हा उपाध्यक्ष सचिन जासूद, दादासाहेब कदम, कोषाध्यक्ष गोपाळ दराडे, प्रसिद्धीप्रमुख अमोल चंदनशिवे ,तालुका अध्यक्ष संजय सुमंत शिंदे, नरेंद्र लहिरे, संजय भालेराव, संजय तमनर,नानासाहेब खराडे, रूपालीताई बोरुडे, मफीज इनामदार,कल्पना चौधरी, अकील फकीर,बाबाजी लाळगे,संपत वाळके,गणपत धुमाळ,विजय पांडे,प्रवीण मालुंजकर,अमोल तळेकर,संतोष नवले,श्याम जगताप,प्रवीण मते आदी पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.